नवी दिल्ली : संपूर्ण देश कोरोना विषाणूच्या संसर्गासोबत लढतोय. कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत जातेय. तसेच कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचंही प्रमाण वाढलंय. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी वाढत्या कोरोना रुग्णांसाठी केंद्र सरकार, पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह यांना जबाबदार धरलंय. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत राहुल गांधी यांनी भारत आता जागतिक कोरोनाचं केंद्र बनल्याचं म्हटलं. तसेच आज आपण आपल्या देशात जे पाहतोय ते पाहून जगाला धक्का बसलाय (Rahul Gandhi criticize Modi Government over Corona situation in India).
राहुल गांधी म्हणाले, “कोविड-19 ने पूर्ण उद्ध्वस्त केलंय. ही लाट नाही तर त्सुनामी आहे. या त्सुनामीने सर्वकाही उद्ध्वस्त केलंय. देशातील कोविड-19 ची परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर केंद्र सरकारने कोरोना नियंत्रणाचा चेंडू राज्यांकडे टोलवला आहे. नागरिक खरोखरच आत्मनिर्भर झाले आहेत. देशातील कोरोना स्थितीला पूर्णपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार आहेत. ते खूप स्वतःवर केंद्रीत होऊन सरकारी यंत्रणेचा उपयोग करत आहेत.”
My interview with PTI about the Covid crisis in India and GOI’s incompetence. https://t.co/zby7XJbNDb
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 1, 2021
“मोदी-शाहांनी कोराना व्हायरसचा संसर्ग होण्यालाच प्रोत्साहन दिलंय”
“मोदी स्वतःची प्रतिमा उजळण्यासाठी नियोजबद्ध योजना आखण्यात आलीय. त्यांचं सगळं लक्ष या योजनेवरच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृह मंत्री अमित शाह यांनी कोराना व्हायरसचा संसर्ग होण्यालाच प्रोत्साहन दिलंय. तसेच त्या कार्यक्रमांचं कौतुकही केलंय. मोदी सरकार अहंकारी सरकार आहे. कोरोनाशी सामना करायचा असेल तर केवळ विनम्र होऊनच लढता येईल. माध्यमं, न्यायपालिका, नोकरशाही अशा कुणीच आपली जबाबदारी पार पाडली नाही. भारत एक असं जहाज आहे जे वादळातही कोणतीही माहिती नसताना प्रवास करतंय,” असंही राहुल गांधींनी नमूद केलं.
हेही वाचा :
व्हिडीओ पाहा :
Rahul Gandhi criticize Modi Government over Corona situation in India