बांग्लादेशही भारताला GDP मध्ये मागे टाकणार, हे नरेंद्र मोदी सरकारचं ‘यश’, राहुल गांधींचं टीकास्त्र

कोरोना आणि लॉकडाऊनमुळं भारताच्या जीडीपीत तब्बल 10.3 टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते. नाणेनिधीचा हा अंदाज खरा ठरला तर भारताचा जीडीपी, गेली शतकानुशतके आपल्याहून कित्येकपट मागे असणाऱ्या बांगलादेशच्याही खाली जाईल.

बांग्लादेशही भारताला GDP मध्ये मागे टाकणार, हे नरेंद्र मोदी सरकारचं 'यश', राहुल गांधींचं टीकास्त्र
Follow us
| Updated on: Oct 14, 2020 | 12:57 PM

नवी दिल्ली : कोरोना आणि लॉकडाऊनचा भारताच्या अर्थव्यवस्थेला जबर फटका बसणार असल्याचा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं वर्तवला आहे. हा फटका इतका जबरदस्त असेल की भारताच्या जीडीपीत तब्बल 10.3 टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते. नाणेनिधीचा हा अंदाज खरा ठरला तर भारताचा जीडीपी, गेली शतकानुशतके आपल्याहून कित्येकपट मागे असणाऱ्या बांगलादेशच्याही खाली जाईल. आयएमएफच्या अंदाजावरुन काँग्रेस नेते राहुल गांधींनी  पुन्हा एकदा नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. (Rahul Gandhi criticize Narendra Modi Govt about IMF projections over GDP )

जीडीपीमध्ये बांग्लादेश भारताच्या पुढे जाण्याच्या तयारीत आहे, हे मोदी सरकारच्या 6 वर्षे काळातील द्वेषानं भरलेल्या सांस्कृतिक राष्ट्रवादाचं यश आहे, अशी टीका राहुल गांधींनी केली. त्यांनी याबाबत आयएमएफच्या अहवालाचा फोटो ट्विट केला आहे.

नाणेनिधीच्या अंदाजानुसार भारतीय व्यक्तीची सरासरी कमाई वर्षाला 1 हजार 877 डॉलर राहिल. तर बांगलादेशचा प्रतिव्यक्ती जीडीपी 4 टक्क्यांनी वाढून 1 हजार 888 डॉलरपर्यंत पोहचेल. त्यामुळं यंदाच्या वर्षात कमाईच्या बाबतीत बांगलादेशी भारतीयांच्याही पुढे जाऊ शकतात. मात्र, ही परिस्थिती जास्त काळ टिकणार नसल्याचंही नाणेनिधीनं स्पष्ट केलंय.

दक्षिण आशियात भारत तिसरा गरीब देश आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि वर्ल्ड इकोनॉमिक आऊटलुकनुसार दक्षिण आशियाई देशात भारत तिसरा गरीब देश ठरणार आहे. पाकिस्तान आणि नेपाळ या दोन देशांचा जीडीपी भारतापेक्षा कमी राहणार आहे. श्रीलंका, भूतान आणि मालदिव देशांचा जीडीपी भारतापेक्षा जास्त राहणार आहे.

2021 च्या वर्षात भारताच्या जीडीपीत चांगली वाढ होईल. आणि याप्रकारे भारत पुन्हा एकदा जगात सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था बनेल असं नाणेनिधीनं म्हटलंय. पुढच्या वर्षात भारताच्या जीडीपीत 8.8 टक्क्यानं वाढण्याचा अंदाज आहे. तर चीनचा विकासदर 8.2 टक्क्यांनी वाढेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय. 2020 च्या वर्षात चीन एकमेव असा देश ठरेल, ज्याच्या विकासदरात 1.9 टक्क्यांची वाढ पाहायला मिळेल.

दरम्यान,  यंदाच्या आर्थिक वर्षात जगाच्या विकासदरात 4.4 टक्क्यांची घट येऊ शकते. मात्र,  2021मध्ये विकासदर जबरदस्त वाढ पाहायला मिळेल. त्यावेळी विकासदर 5.1 टक्क्यांच्या गतीनं वाढणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

संबंधित बातम्या : 

ही गोष्ट खूपच धोकादायक; पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ व्हिडीओवर राहुल गांधींची प्रतिक्रिया

कांदा जमिनीच्या खाली उगवतो की वर, राहुल गांधींना काय कळतं?, भाजपचा हल्लाबोल

(Rahul Gandhi criticize Narendra Modi Govt about IMF projections over GDP )

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.