सर्वांना भारतीय सैन्याच्या शौर्यावर विश्वास, मात्र पंतप्रधानांना नाही, चीन मुद्द्यावरुन राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्ला

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी चीनच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे (Rahul Gandhi on PM Modi).

सर्वांना भारतीय सैन्याच्या शौर्यावर विश्वास, मात्र पंतप्रधानांना नाही, चीन मुद्द्यावरुन राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्ला
Follow us
| Updated on: Aug 16, 2020 | 1:17 PM

नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी चीनच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे (Rahul Gandhi on PM Modi). भारत-चीन सीमेवरील तणावाचा मुद्दा उपस्थित करत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर खोटेपणाचा आणि भेकडपणाचा आरोप केला आहे (Rahul Gandhi on India China border issue). सर्वांना भारतीय सैन्याच्या क्षमतेवर आणि शौर्यावर विश्वास आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींना नाही, असं मत त्यांनी व्यक्त केलं. ट्वीट करत त्यांनी हे मत मांडलं.

राहुल गांधींनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं, “सर्वांना भारतीय सैन्याच्या क्षमतेवर आणि शौर्यावर विश्वास आहे. मात्र, ज्यांच्या भ्याडपणामुळे चीनने आपल्या जमिनीवर ताबा घेतला, ज्यांच्या खोटेपणामुळे ही जमीन आता चीनकडेच राहील अशा पंतप्रधानांना भारतीय सैन्यावर विश्वास नाही.”

चीनच्या मुद्द्यावर राहुल गांधींनी सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर हल्ला चढवला आहे. पंतप्रधान मोदींनी सीमा प्रश्न आणि भारतीय सैनिकांच्या बलिदानानंतरही एकदाही चीनचं नाव घेऊन त्यांना सुनावलं नाही, असाही आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

मोदी सरकार भारत-चीन सीमेवर काय सुरु आहे याची खरी माहिती देत नाही. काही गोष्टी लपवल्या जात आहेत, असाही आरोप राहुल गांधींनी केलाय. याआधी राहुल गांधी यांनी याचबाबत काही व्हिडीओ देखील शेअर केले होते. यात चीनचं सैन्य भारतीय हद्दीत आतमध्ये आल्याचा दावा करण्यात आला होता.

लडाखमध्ये सीमा वादावरुन चीन आणि भारतात सुरु असलेला वाद अद्याप थांबण्याची कोणतीही चिन्ह नाहीत. गलवान खोऱ्यातील तणावाला आता 100 दिवस उलटून गेले आहेत. अजूनही चीनकडून आपल्या सैनिकांना मागे घेण्यास टाळाटाळ होत आहे.

भारत-चीन उच्चस्तरावरील बैठकींमध्ये सामंजस्य दाखवत एका ठिकाणावरुन सैन्या मागे घेतल्यास दुसऱ्या ठिकाणावर पुन्हा चिनी सैन्य अतिक्रमण करत असल्याचाही आरोप होत आहे. गलवान खोऱ्यानंतर लडाखच्या पँगोंग तलाव परिसरातही चीकडून घुसखोरीचा प्रयत्न होत आहे.

राहुल गांधींच्या या थेट हल्ल्यानंतर आता भाजपकडूनही तीव्र प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

भाजपनं खोटेपणाचाही संस्थात्मक प्रचार केला, यामुळे देशाला मोठी किंमत मोजावी लागेल : राहुल गांधी

गलवान खोर्‍यात चीनची घुसखोरी, सरकार सोनिया-राहुल गांधींना उत्तर देण्यात व्यस्त : सामना

चीनला चोख प्रत्युत्तर द्या, अन्यथा जनादेशाचा ऐतिहासिक विश्वासघात, मनमोहन सिंह यांचा मोदी सरकारला सल्ला

Rahul Gandhi on India China border issue

...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.