नवी दिल्ली : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी बुधवारी महिला काँग्रेसच्या स्थापना दिनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी भाजपच्या हिंदुत्वावर एक प्रकारे प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. आज देशात आरएसएसवाल्या भाजपची सत्ता आहे. त्यांची आणि आमची विचारधारा वेगळी आहे. काँग्रेस कार्यकर्ता होण्याच्या नात्यानं मी अन्य विचारधारांसोबत तडजोड करु शकतो. मात्र, भाजप आणि संघाच्या विचारधारेशी कधीही नाही. गांधीजी, सावरकर आणि गोडसे यांच्या विचारधारेत काय अंतर आहे? हा मोठा आणि गहन प्रश्न असल्याचं राहुल गांधी म्हणाले. (Rahul Gandhi criticizes BJP and RSS on Hindutva issue)
भाजप आणि संघाचे लोक सांगतात की त्यांचा पक्ष एक हिंदुत्ववादी पक्ष आहे. मात्र, मागील शंभर-दोनशे वर्षात एका व्यक्तीने हिंदू धर्म समजून घेतला आणि त्यानुसार आपलं आचरण केलं. ती व्यक्ती म्हणजे महात्मा गांधी. ही बाब आम्हीही मानतो आणि आरएसएस-भाजपचे लोकही मानतात. जर महात्मा गांधी यांनी हिंदू धर्म समजून घेतला आणि संपूर्ण आयुष्य त्यांनी तो समजून घेण्यात घालवलं. मग संघाच्या विचारधारेनं त्यांच्या छातीत तीन गोळ्या का झाडल्या? असा सवाल राहुल गांधी यांनी विचारला आहे. नेल्सन मंडेला पासून मार्टिन लूथर किंगपर्यंत सर्व मानतात की गांधी एक उदाहरण होते. त्यांनी अहिंसेचा मार्ग चांगल्या प्रकारे समजून घेतला आणि सर्वांना शिकवलाही, असंही राहुल गांधी म्हणाले.
भाजपा-RSS और हमारी विचारधारा अलग है।
कांग्रेस का कार्यकर्ता होने के नाते मैं यह बात समझ सकता हूँ कि मैं बाक़ी विचारधाराओं के साथ कोई न कोई समझौता कर सकता हूँ, लेकिन मैं भाजपा और RSS की विचारधारा के साथ कभी भी समझौता नहीं कर सकता : श्री @rahulGandhi #MahilaCongressFoundationDay pic.twitter.com/wscSKJ2eDb— Congress (@INCIndia) September 15, 2021
राहुल गांधी संघावर टीका करताना पुढे म्हणाले की, महात्मा गांधी यांचे जुने फोटो तुम्ही पाहिले असतील तर त्यांच्या आजूबाजूला 2 – 3 महिला असत. तुम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या आसपास कधी महिला पाहिल्या आहेत का? या मागील कारण आहे की, काँग्रेस महिलांचा सन्मान करते आणि त्यांना व्यासपीठ निर्माण करुन देते. तर मोदी आणि संघ एखाद्या महिलेला पंतप्रधानपदी पाहू शकत नाहीत. पण काँग्रेसनं ते करुन दाखवलं आहे, असा टोलाही राहुल गांधी यांनी भाजप आणि संघाला लगावला आहे.
गांधी जी की फोटो में आपको तीन से चार महिलाएं दिखेंगी ही दिखेंगी; कभी आपने मोहन भागवत जी के साथ किसी महिला की फोटो देखी है? नहीं देखी; क्योंकि इनका संगठन महिला शक्ति का दमन करता है और हमारा संगठन महिला शक्ति को एक मंच देता है : श्री @rahulGandhi #MahilaCongressFoundationDay pic.twitter.com/E4xrpu5V75
— Congress (@INCIndia) September 15, 2021
राहुल गांधी यांनी महिला काँग्रेसचा नव्या लोगोचंही अनावरण केलं. त्यांनी उपस्थित लोकांना या लोगोचा अर्थ विचारला आणि शेवटी स्वत: त्याचा अर्थ सांगितला. भगवान शंकर, महावीर, बुद्ध, गुरुनानक, जीसस क्राइस्ट, साई बाबा सर्वांच्या प्रतिमेत पुढे हात असतो. मुस्लिम धर्मात कुठले चिन्ह नसते. पण जेव्हा तुम्ही अल्लाहकडून काही मागता तेव्हा आपल्या हाताने मागता. उजवा हात तुम्हाला सर्व ठिकाणी दिसते. त्या हाताचा अर्थ असा असतो की सत्याला घाबरून जाऊ नका. काँग्रेस कुणालाही घाबरत नाही.
LIVE: Shri @RahulGandhi addresses @MahilaCongress Foundation Day#MahilaCongressFoundationDay
https://t.co/yL8fVF3PtL— Congress (@INCIndia) September 15, 2021
इतर बातम्या :
सरकारचा अध्यादेश आगामी पोटनिवडणुकीला लागू होणार नाही? पंकजा मुंडेंनंतर नरकेंचही मोठं वक्तव्य
VIDEO : नाशिक पोलीस अॅक्शन मोडवर, महिला पोलिसांकडून टवाळखोरांची धुलाई
Rahul Gandhi criticizes BJP and RSS on Hindutva issue