पत्ता लोककल्याण मार्ग असला म्हणून काय लोकांचे कल्याण होत नाही; ईपीएफ व्याज दर कपातीवरून राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
केंद्र सरकारने ईपीएफच्या व्याज दरात कपात केली आहे. हाच मुद्दा पकडून राहुल गांधी यांनी केंद्रावर निशाणा साधला आहे. केंद्र सरकारने साडेसहा कोटी कर्मचाऱ्यांचा वर्तमान आणि भविष्यकाळ बर्बाद केल्याची टीका त्यांनी केली आहे.

मुंबई : केंद्र सरकारने ईपीएफच्या व्याज दरात कपात करत (EPF Interest Rate) लाखो कर्मचाऱ्यांना मोठा धक्का दिला आहे. नव्या व्याज दरानुसार आता कर्मचाऱ्यांना ईपीएफवर 8.1 टक्के इतकेच व्याज मिळणार आहे. पूर्वी ईपीएफचा व्याज दर 8.5 टक्के इतका होता. ईपीएफमध्ये कपात करण्यात आल्याने आता वर्ष 2021 – 22 साठी कर्मचाऱ्यांना ईपीएफवर केवळ 8.1 टक्केच व्याज मिळणार आहे. ईपीएफच्या व्याज दरात कपात करण्यात आल्याने कर्मचारी नाराज आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी देखील याच मुद्द्यावरून पंतप्रधान मोदी (PM Modi) आणि केंद्रातील भाजपच्या सरकारवर निशाणा साधला आहे. घराचा पत्ता ‘लोक कल्याण मार्ग’ असा केल्याने लोकांचे कल्याण होत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साडेसहा कोटी कर्मचाऱ्यांचा वर्तमान आणि भविष्यकाळ बर्बाद केला आहे. केंद्राने सध्या महागाई वाढवा आणि कमाई घटवा मॉडेल लागू केल्याची टीका राहुल गांधी यांनी केली आहे. त्यांनी ट्विट करत भाजपावर निशाणा साधला आहे.
नेमकं काय म्हटलं राहुल गांधींनी
केंद्र सरकारने ईपीएफच्या व्याज दरात कपात करण्यास मंजुरी दिली आहे. यावरून राहुल गांधी यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी ट्विट कर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. कोणी आपला पत्ता बदलून ‘लोक कल्याण मार्ग’ असा केला तर त्यामुळे लोकांचे कल्याण होत नाही. ईपीएफमध्ये जी कपात करण्यात आली आहे, त्यमुळे देशातील साडेसहा कोटी लोकांचे वर्तमान आणि भविष्यकाळ बर्बाद झाला आहे. केंद्राकडून महागाई वाढवली जात आहे, तर लोकांचे उत्पन्न कमी होत असल्याची टीका राहुल गांधी यांनी कली आहे.



घर का पता ‘लोक कल्याण मार्ग’ रख लेने से लोगों का कल्याण नहीं होता।
प्रधानमंत्री ने साढ़े 6 करोड़ कर्मचारियों के वर्तमान और उनके भविष्य को बर्बाद करने के लिए ‘महंगाई बढ़ाओ, कमाई घटाओ’ मॉडल को लागू किया है। pic.twitter.com/lr1prlOZEa
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 4, 2022
कोट्यवधी कर्मचाऱ्यांना फटका
केंद्र सरकारने ईपीएफमध्ये कपात केल्याने याचा फटका सुमारे साडेसहा कोटींहून अधिक कर्मचाऱ्यांना बसला आहे. पूर्वी ईपीएफचा व्याज दर हा 8.5 टक्के इतका होता. आता त्यामध्ये कपात करण्यात आली असून, तो 8.1 टक्के इतका करण्यात आला आहे. आता कर्मचाऱ्यांना आर्थिक वर्ष 2021 – 22 साठी ईपीएफवर 8.1 दरानेच व्याज मिळणार आहे. व्याज दरात घट झाल्याने मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे.