Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी लालू प्रसाद यादव यांच्याकडून मटण रेसिपी शिकत केली राजकारणावर चर्चा, Watch Video
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओत लालू प्रसाद यादव यांच्यासोबत मटण बनवताना दिसत आहेत.
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. राहुल गांधी यांनी शेअर केलेलया 56 सेकंदाच्या या व्हिडीओत ते लालू प्रसाद यादव यांना अनेक प्रश्न विचारताना दिसत आहे. मटण रेसिपी शिकण्यासोबत त्यांनी राजकीय चर्चाही केली. राहुल गांधी यांनी लालूप्रसाद यादव यांना विचारलं की, तुम्ही यात काहितरी मिक्स करून टाकलं आहे , यात आणि राजकारणात काय फरक आहे? या प्रश्नावर लालूप्रसाद यादव यांनी त्यांच्या अंदाजात उत्तर दिलं. मिक्सिंगशिवाय राजकारण होऊच शकत नाही. या व्हिडीओत राहुल गांधी हे लालू प्रसाद यादव यांना भाजपाने गेल्या काही वर्षात द्वेषाचे राजकारण कसे सुरू केले? यावर लालू यादव यांनी उत्तर दिले की, सत्तेची भूक काहीही करू शकते.
काय आहे राहुल गांधी यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत?
राहुल गांधी यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ जुना असून आता शेअर केला आहे. राहुल गांधी यांनी विचारलं की, मी आणि देशाची नवीन पिढी तुमच्याकडून काय शिकू शकते? तेव्हा लालूप्रसाद यांनी उत्तर दिलं की, तुझ्या आई वडिलांनी, आजी आजोबांनी देशाला दिशा दाखवली होती. ते कधीच विसरून चालणार नाही. या भेटीदरम्यान नूंह हिंसेवरही चर्चा झाली. तेव्हा तेजस्वी यादव यांनी सांगितलं की, हिंसेच्या माध्यमातून देशाची शांतता भंग केली जात आहे.
लोकप्रिय नेता, लालू जी से उनकी सीक्रेट रेसिपी और ‘राजनीतिक मसाले’ पर दिलचस्प बातचीत हुई।
ग़रीबों, वंचितों, अल्पसंख्यकों और महिलाओं के लिए INDIA की सोच एक है – समानता, प्रगति और सशक्तिकरण।
लालू जी से मेरी ख़ास मुलाक़ात का पूरा वीडियो यूट्यूब पर देखें: https://t.co/5RbVDqVfY0 pic.twitter.com/59jekdEBgQ
— Rahul Gandhi (@RahulGandhi) September 2, 2023
एक दिवस आधीच झाली होती विरोधकांची बैठक
राहुल गांधी यांनी हा व्हिडीओ मुंबईतील विरोधकांच्या बैठकीनंतर शेअर केला आहे. मुंबईत झालेल्या बैठकीत भाजपा विरोधी पक्षाचे नेते एकवटले होते. इंडिया आघाडीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान दिलं जाऊ शकतं असं एकमत झालं.