राहुल गांधी हॉलिडे ट्रिपसाठी इटलीला; संतप्त शेतकरी नेते म्हणाले…
राहुल गांधी यांनी शेतकरी आंदोलनाच्या ठिकाणी आले नाहीत. त्यांनी आमच्याशी संवादही साधला नाही. | Rahul Gandhi
नवी दिल्ली: काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) हे मोक्याच्या क्षणी परदेशात जाण्याच्या सवयीमुळे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. दिल्लीत शेतकरी आंदोलन (Farmers protest) तापले असताना राहुल गांधी यांनी सुट्टी घालवण्यासाठी परदेशात जाणे अनेकांन रुचलेले नाही. यावरुन शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी राहुल यांना लक्ष्य केले. राहुल गांधी यांनी शेतकरी आंदोलनाच्या ठिकाणी आले नाहीत. त्यांनी आमच्याशी संवादही साधला नाही. ते सर्वकाही हवेत करत आहेत. अशावेळी विरोधी पक्षाने मजबूत असायला हवे. पण विरोधी पक्ष प्रचंड कमकुवत असल्याचे टिकैत यांनी म्हटले. (Rahul Gandhi on personal trip abroad, will be absent for party’s Foundation Day)
राहुल गांधी हे रविवारी इटलीला रवाना झाले. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी काही दिवसांसाठी वैयक्तिक कारणासाठी परदेशात जात आहेत. परिणामी राहुल गांधी आज काँग्रेसच्या स्थापना दिवसालाही (Congress 136th foundation day) उपस्थित राहू शकणार नाहीत. तसेच केरळमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील कामगिरीचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला ते उपस्थित राहणार नाहीत. त्यांच्याऐवजी ज्येष्ठ नेते तारिक अन्वर या बैठकीला हजर असतील.
राहुल गांधी वादाच्या भोवऱ्यात का सापडू शकतात?
यापूर्वी संसदेत कृषी विधेयक मांडण्यात आले तेव्हादेखील राहुल गांधी आणि सोनिया गांधी परदेशात गेले होते. त्यावेळी सोनिया गांधी यांच्या प्रकृतीच्या कारणासाठी राहुल गांधी यांना परदेशात जावे लागले असले तरी निर्णायक क्षणी त्यांचे संसदेत उपस्थित नसणे अनेकांच्या डोळ्यात खुपले होते.
त्यानंतर आता दिल्लीतील शेतकरी आंदोलन निर्णायक टप्प्यावर पोहोचले असताना परदेशवारी करून राहुल गांधी यांनी विरोधकांच्या हाती आयते कोलीत दिले आहे. आगामी काळात विरोधकांकडून या मुद्दयाचे भांडवल केले जाऊ शकते.
29 डिसेंबरच्या बैठकीला शेतकरी तयार, मात्र सरकारसमोर ‘या’ अटी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करण्याची तयारी दर्शवल्यानंतर आता मंगळवारी केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. मात्र, शेतकऱ्यांनी सरकारच्या या बैठकीत केवळ कृषी कायदा मागे घेणे आणि एमएसपी यावरच चर्चा होईल असं स्पष्ट केलंय. त्यामुळे सरकार आणि शेतकऱ्यांमधील या चर्चेत काय तोडगा निघतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
संबंधित बातम्या:
‘…म्हणून कृषी विधेयकांवरील चर्चेवेळी मी संसदेत उपस्थित नव्हतो’
नरेंद्र मोदींचे भाषण ऐकणाऱ्या कार्यकर्त्यांवर पंजाब सरकारचा लाठीचार्ज, भाजप खासदाराचा आरोप
मोदी सरकारला धक्क्यावर धक्के सुरुच, NDA तून आणखी एक मित्रपक्ष बाहेर
(Rahul Gandhi on personal trip abroad, will be absent for party’s Foundation Day)