भारत जोडो यात्रेत रोहित वेमुलाची आई…; राहुल गांधींनी चारमिनारवर फडकवला तिरंगा…

ज्या रोहित वेमुलाने 2016 मध्ये आत्महत्या केली होती, त्याच्या आईने भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्या होत्या.

भारत जोडो यात्रेत रोहित वेमुलाची आई...; राहुल गांधींनी चारमिनारवर फडकवला तिरंगा...
Follow us
| Updated on: Nov 01, 2022 | 8:06 PM

हैदराबाद: सध्या काँग्रेसची भारत जोडो यात्रेत अनेक लोकं सहभागी होत आहेत. त्यामुळे राहुल गांधी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आज पुन्हा एकदा भारत जोडो यात्रेत 2016 मध्ये आत्महत्या करणारा दलित विद्यार्थी रोहित वेमुलाची आई राधिका वेमुला यांनी भारत जोडो यात्रेत राहुल गांधींची भेट घेतली. त्यानंतर राहुल गांधी यांनी रोहित वेमुलाबद्दल ट्विट करत त्यांनी सांगितले की, रोहित वेमुला म्हणजे सामाजिक भेदभाव आणि अन्यायाविरुद्धच्या माझ्या संघर्षाचे प्रतीक आहे. तसेच रोहित वेमुलाच्या आईने या यात्रेत सहभाग दर्शवल्याने भारत जोडोला नवे धैर्य मिळाले असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यानंतर हैदराबाद दौऱ्यामध्ये राहुल गांधी यांनी ऐतिहासिक चारमिनारवर तिरंगा फडकवला.

तर दुसरीकडे, तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या पक्षावर राहुल गांधींनी केलेल्या टिप्पणीमुळे त्यांच्या राज्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर देत म्हणाले की, राहुल गाधींनी आधी आपल्या लोकांचा विश्वास जिंकावा.

राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर राधिका वेमुला यांनीही ट्विट केले आहे, त्यांनी त्या ट्विटमध्ये राहुल गांधी यांच्या सोबतचा प्रवास सांगत त्यांनी भाजप-आरएसएसच्या हल्ल्यापासून संविधान वाचवा आणि रोहित वेमुलाला न्याय द्या अशी मागणीही त्यांनी केली.

रोहित वेमुलाच्या आईबद्दल काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन राधिका वेमुला यांचे ‘भारत जोडो यात्रे’तील फोटो शेअर केले आहेत.

रोहित वेमुला यांच्या आत्महत्येनंतर उच्च शिक्षण संस्थांमधील जातिवादाच्या विरोधात देशभर चळवळ उभा राहिली होती. आंध्र प्रदेशातील हैदराबाद येथून आता पुढे भारत जोडी यात्रा पुढे जात आहे.

तेलंगणाचे आरोग्य मंत्री केटीआर यांनी राहुल यांच्या वक्तव्यावर जोरदार टीका केली. तेलंगणा राष्ट्र समितीचे कार्यवाहक अध्यक्ष आणि तेलंगणाचे आरोग्य मंत्री केटी रामाराव यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका करत ते म्हणाले की, दुसऱ्यांवर टीका करण्याआधी तुम्ही तुमच्या नेत्यांना विश्वासात घ्या नंतर तुम्ही टीका करा अशा स्वरुपाची त्यांच्यावर टीप्पणी करण्यात आली.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.