Rahul Gandhi : मोठ्या कोंडीत सापडलो, काय निवडू, रायबरेली की..’, राहुल गांधी यांच्या प्रश्नाला वायनाडच्या जनतेने दिले असे खास उत्तर
राहुल गांधी लोकसभा निवडणुकीत दोन मतदारसंघात नशीब आजमावत होते. त्यांच्यावर दोन्ही मतदारसंघातील जनतेने विश्वास दाखवला. रायबरेली आणि दक्षिणेतील वायनाड या ठिकाणी त्यांचा विजय झाला. आता यापैकी त्यांना एक मतदारसंघ निवडायचा आहे.
केरळमधील वायनाड आणि उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदार संघ निवडणूक काळात चर्चेत होते. लोकसभा निवडणूक 2024 मध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांना या दोन्ही ठिकाणच्या जनतेने भरघोस मते दिली. त्यांचा मोठा विजय झाला. उत्तर आणि दक्षिणेतील या मतदार संघातील जनतेने राहुल गांधी यांच्यावर प्रेमाचा वर्षाव केला. आता या दोघांपैकी एक मतदार संघ निवडीचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर उभे ठाकले आहे. दोन्ही मतदार संघातील जनतेने भारावलेल्या राहुल गांधी यांच्यासाठी पण हा पेच सोडविणे सोपे नाही. ते स्वतः संभ्रमात पडले आहे. तर वायनाडच्या जनतेने त्यांना असा खास संदेश पाठवला आहे.
वायनाडच्या लोकांना दिला धन्यवाद
राहुल गांधी यांनी त्यांच्या मनातील द्विधा जनतेसमोर आणली. ते वायनाड आणि रायबरेली येथील लोकसभा मतदारसंघापैकी एकाचे खासदार असतील. बुधवारी ते केरळमध्ये पोहचले. मलप्पुरम येथे त्यांनी जनतेशी संवाद साधला. कोणता मतदार संघ सोडावा यासंदर्भात आपण संभ्रमात असल्याचे ते म्हणाले. त्यांनी पुन्हा निवडून दिल्याबद्दल वायनाडच्या जनतेचे जाहीर आभार मानले.
रायबरेली काँग्रेसचा गड
रायबरेली हा काँग्रेसचा गड मानण्यात येतो. या मतदारसंघाशी काँग्रेसची नाळ जोडल्या गेली आहे. पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यापासून ते इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्यापर्यंत ही नाळ घट्ट आहे. आता सोनिया गांधी यांनी पण हे नातं घट्ट केले आहे. तर राहुल गांधी यांनी पण त्यात अंतर केलेले नाही. येथील जनतेने राहुल गांधी यांना मोठा विजय मिळवून दिला आहे. त्यामुळेच कोणता लोकसभा मतदारसंघ निवडा असा संब्रम त्यांच्यापुढे आहे.
वायनाडने दुसऱ्यांदा दिली साथ
केरळमधील वायनाडने राहुल गांधी यांना दुसऱ्यांदा साथ दिली. 2019 मध्ये राहुल गांधी यांनी अमेठी आणि वायनाडमधून निवडणूक लढवली होती. स्मृती इराणी यांनी त्यांचा पराभव केला होता. तर वायनाडमध्ये ते विजयी झाले होते. यावेळी रायबरेली आणि वायनाडमधून राहुल गांधी विजयी झाले. तर स्मृती इराणी यांचा पराभव झाला आहे. जेव्हा पण त्यांचे राजकीय करियर पणाला लागले त्यावेळी वायनाडने त्यांना साथ दिली. त्यामुळेच राहुल गांधी यांच्यासमोर मतदार संघ निवडीचे मोठे आव्हान आहे.
काय दिले उत्तर
राहुल गांधी म्हणाले की, माझ्या आता लक्षात आले आहे की, केरळचे लोक पंरपरा आणि अभिव्यक्तीवर प्रेम करणारे आहेत. भारतातील प्रत्येक राज्याची आपली स्वतःची एक प्रतिभा, अभिव्यक्ती, इतिहास, संस्कृती आहे. मल्याळम, मराठी, तामिळ, बंगाली अनेक भाषा आहेत आणि पंरपरा आहेत. अंहकारा या संस्कृतीत थारा नसल्याचा संदेश मिळाल्याचे राहुल गांधी म्हणाले.