आम्ही कोण? आम्ही कोण म्हणुनी काय पुसता..राहुल गांधीनी मांडला तीनच ओळीत लेखाजोखा..
पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेसवर टीका करताना गेल्या 70 वर्षात तुम्ही काय केले असा सवाल करतात. मात्र या प्रश्नाला राहुल गांधींनीच आज उत्तर देत केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल चढविला.
नवी दिल्लीः काँग्रेसची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) आता वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत येऊ लागली आहे. विरोधकांनी केलेल्या टीकेलाही राहुल गांधी ठोस प्रत्युत्तर दिले जात आहे. राहुल गांधींकडूनही (Rahul Gandhi) केंद्र सरकारवर हल्लाबोल करण्याची एकही संधी सोडली जात नाही. राहुल गांधींची केरळमध्ये भारत जोडो यात्रा असतानाच त्यांनी ट्विट करत केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) अनेकदा म्हणतात काँग्रेसने 70 वर्षांत काय केले? असा सवाल करतात. त्यावर राहुल गांधींनी म्हटले आहे की, आम्ही भारताला सर्वाधिक बेरोजगारी कधी दिली नाही.
PM often asks- ‘70 saal mein kya kiya?’
We never gave India the highest-ever unemployment.
We never gave India record price rise it faces today.
BJP govt is not a govt for farmers, youth & women. It’s a govt for 5-6 richest Indians who are monopolising any business they want.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) September 24, 2022
आणि आजच्यासारखी विक्रमी भाववाढही कधीच दिली नाही. असं म्हणत त्यांनी उद्योगपती धार्जिणी भाजप असल्याचे म्हणत हे भाजप सरकार शेतकरी, तरुण आणि महिलांचे सरकार नाही, तर 5-6 श्रीमंत उद्योगपतींचे सरकार असल्याची टीका त्यांनी आपल्या ट्विटमधून केली आहे.
राहुल गांधींनी आजची परिस्थिती सांगत असतानाच त्यांनी काँग्रेसचीही परिस्थिती सांगितली आहे. आजच्यासारखी महागाई आणि बेरोजगारीची काँग्रेसच्या काळात नव्हती असंही त्यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल करत असताना राहुल गांधी यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ते म्हणतात की, पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी म्हणतात की, 70 वर्षांत काँग्रेसने काय केले.
त्यावर राहुल गांधींनी एकाच वाक्यात उत्तर देत सांगितले की, गेल्या सत्तर वर्षात आजच्या सारखी बेरोजगारी आम्ही निर्माण केली नाही.
महागाईही तुमच्या राज्यासारखी वाढवली नाही. त्यामुळे हे भाजप सरकार शेतकरी आणि महिलावर्गासाठी नसून धनदांडग्यांसाठी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
राहुल गांधींनी भाजप सरकारवर आणि केंद्रावर टीका करताना हे सरकार भांडवलदारांचे असल्याचे म्हटले आहे. देशात महागाई, बेरोजगारी प्रचंड वाढत असतानाही उद्योगपतींचाच फायदा भाजपकडून केला जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
ज्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हिमाचलमधील युवकांसाठी ऑनलाईन मार्गदर्शन केले, त्यानंतर काही तासांनीच राहुल गांधींनी ट्विट करत त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी रविवारी सकाळी केरळमधील त्रिशूरमधून आपली भारत जोडो यात्रा सुरु केली. या यात्रेत त्यांच्यासोबत असलेल्या शेकडो कामगारांनी गॅस सिलिंडरच्या आकारातील कटआउट आणि बॅनर घेऊन एलपीजीच्या दरवाढीविरोधात जोरदार निदर्शनं आणि घोषणाबाजी केली.
काँग्रेसची ही 150 दिवस चालणारी भारत जोडो यात्रा रविवारी वडक्कनचेरी येथे थांबणार असून आहे. नागरिक आणि कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधणार आहेत.
केरळमधील रविवारची भारत जोडो यात्रा दोन कारणासाठी चर्चेत आली. राहुल गांधी यांनी गेल्या सत्तर वर्षातील काँग्रेसचा इतिहासच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उलघडून दाखवला.
त्याचबरोबर एलपीजीच्या वाढत्या किंमतीमुळे या यात्रेत जोरदार निदर्शन करण्यात आली. यावेळी देशात भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ द्वेष पसरवत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.