VIDEO | तुम्ही कुठल्याही पक्षाचे असा, राहुल गांधींचा हा व्हिडीओ तुम्ही लाईक केल्याशिवाय राहणार नाही ! मुलगी तर सातवे आसमान पर !
राहुल गांधींचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. Rahul Gandhi Puducherry visit viral video

नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी बुधवारी पुदूचेरीच्या दौऱ्यावर होते. यावेळी घडलेल्या एका घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. राहुल गांधींनी त्यावेळी मच्छीमार, शेतकरी यांच्याशी चर्चा केली आणि केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. यादरम्यान एका मुलगी राहुल गांधींची सही घेण्यासाठी येते. राहुल गांधींची सही मिळाल्यानंतर तिला आनंदही होतो. यानंतर ती भावूक होते त्यामुळे राहुल गांधी तिची गळाभेट घेतात. राहुल गांधींचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. (Rahul Gandhi Puducherry visit viral video hugging a student during conversation)
राहुल गांधींचा विद्यार्थ्याशी संवाद
पुदूचेरीचेरीच्या दौऱ्यावर असताना राहुल गांधींनी विद्यार्थी विद्यार्थिनींशी संवाद साधला. यावेळी एक मुलगी राहुल गांधींची सही घेण्यासाठी मंचाजवळ पोहोचते. राहुल गांधींनी तिला सही दिल्यानंतर तिच्यासोबत हस्तोंदलन केले. यामुळे ती मुलगी भावूक झाली. यानंतर त्यांनी तिची गळाभेट घेत फोटो घेतला.
The zealous enthusiasm shown by this young student from Puducherry is but a reflection of one thing: young India is filled with tremendous energy; true leaders recognise it, support it & fuel it for our nation’s prosperity.#RahulGandhiWithPuducherry pic.twitter.com/ekLsLXLoKv
— Congress (@INCIndia) February 17, 2021
राहुल गांधींचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
राहुल गांधी गेले काही दिवस दक्षिण भारतातील तामिळनाडू आणि पुदूचेरीच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते मच्छीमार, शेतकरी आणि स्थानिक लोकांशी संवाद साधत आहेत. इथे राहुल गांधींचे जोरदार स्वागत करण्यात येत आहे. पुढील काळात येईन त्यावेळी मच्छीमारांसोबत होडीतून प्रवास करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं.
तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल, पुदूचेरी आणि आसामची येत्या काही दिवसामध्ये निवडणूक जाहीर होणार आहे. राहुल गांधींनी तामिळनाडू आणि पाँडिचेरीवर लक्ष केंद्रीत केलं आहे. पाँडिचेरीत काँग्रेसच्या चार आमदारांनी राजीनामा दिल्यानं तेथील काँग्रेस सरकार सकंटात आलं असताना राहुल गांधींचा दौरा आयोजित करण्यात आला होता.
संबंधित बातम्या: मोदीजी, भारताचा नंबर कधी येणार? लसीकरणाबाबत राहुल गांधींचा सवाल
राहुल गांधी पुन्हा एकदा राष्ट्रपतींना भेटणार, कारण काय?
(Rahul Gandhi Puducherry visit viral video hugging a student during conversation)