PHOTOS : पुशअप्स, समुद्रात स्विमिंग आणि अ‍ॅब्स… ‘या’ कारणांमुळे सर्वत्र राहुल गांधींच्या फिटनेसची चर्चा

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या राजकीय भूमिकांची जशी चर्चा होते तशीच त्यांच्या फिटनेसचीही नेहमीच होत असते. (Rahul Gandhi Fitness)

| Updated on: Mar 01, 2021 | 10:42 PM
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या राजकीय भूमिकांची जशी चर्चा होते तशीच सध्या त्यांच्या फिटनेसचीही चर्चा सुरु आहे. राहुल गांधी सध्या तामिळनाडूच्या दौऱ्यावर असून या ठिकाणीही त्यांच्या फिटनेसची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. केवळ फिटनेसची चर्चाच रंगली नाही तर राहुल यांनी अवघ्या 9 सेकंदात 13 पुशअप्स मारून आपला फिटनेसचा दमही दाखवून दिला. निमित्त होतं एका शाळेतील कार्यक्रमाचं.

1 / 5
राहुल गांधी हे तामिळनाडूच्या दौऱ्यावर आले आहेत. आज त्यांनी कन्याकुमारी येथे रोड शो केला. त्यानंतर त्यांनी एका शाळेत येऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांशी गप्पा मारता मारता त्यांनी आयकिदो हा मार्शल आर्टचा प्रकार विद्यार्थ्यांना करून दाखवला. त्यानंतर मेरोलिन शेनिघा नावाच्या विद्यार्थ्यीनीने त्यांना पुशअप मारण्याची विनंती केली. राहुल गांधी यांनीही मागे पुढे न पाहता तात्काळ पुशअप्स मारण्यास सुरुवात केली.

2 / 5
दरम्यान, राहुल गांधी यांनी दक्षिणेवर सर्वाधिक लक्ष केंद्रीत केलं आहे. दक्षिणेकडील राज्यांमध्ये ते वारंवार दौरा करत आहेत. पुद्दुचेरी , केरळ आणि तामिळनाडू या दक्षिणेतील तीन राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. त्यामुळे या राज्यांवर त्यांनी अधिक लक्ष केंद्रीत केलं आहे. त्यातही त्यांनी केरळवर सर्वाधिक लक्ष केंद्रीत केलं आहे.

3 / 5
काही दिवसांपूर्वी राहुल गांधी केरळमध्ये आले होते. यावेळी ते मच्छिमारांसोबत समुद्रावर गेले होते. त्यावेळी त्यांनी मच्छिमारांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर त्यांनी त्यांच्यासमोत होडीतून प्रवासही केला होता. एवढेच नव्हे तर त्यांनी समुद्रात उडी मारून पोहण्याचा आनंदही लुटला होता. याचवेळी राहुल यांचा एक फोटो व्हायरल झाला होता. त्यात ते त्यांचे सिक्स अॅब्स दाखवताना दिसत आहेत. राहुल यांच्या या फिटनेसचं सोशल मीडियावरून मात्र प्रचंड कौतुक होतंय.

4 / 5
व्हायरल झालेल्या व्हिडीओनुसार, राहुल गांधी पुशअप्स मारताना दिसत आहेत. अवघ्या 9 सेकंदात त्यांनी 13 पुशअप्स मारले. त्यानंतर या विद्यार्थ्यीनीने त्यांना एका हाताने पुशअप्स मारायला सांगितले. राहुल यांनी या विद्यार्थीनीची ही इच्छाही पूर्ण करत एका हाताने पुशअप्स मारले.

5 / 5
Follow us
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.