Rahul Gandhi : गांधी घरण्याबाहेर जाणार काँग्रेसचे नेतृत्त्व; या 6 नेत्यांची नावं चर्चेत; राहुल गांधी म्हणाले प्रियंका गांधींचं नाव या पदासाठी नको…
याप्रकरणी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी 'कृपया प्रियंका गांधींचे नाव घेऊ नका, गांधी नसलेल्या निवडणूक लढवू नका, ज्याला उमेदवारी भरायची आहे, त्याला काँग्रेस अध्यक्ष निवडून द्या.'
नवी दिल्लीः काँग्रेसच्या अध्यक्ष (Congress President) निवडीबाबत आता पुन्हा एकदा काँग्रेसला आता उधाण आले आहे. काँग्रेसकडून आपल्या नवीन अध्यक्ष पदाच्या निवडीची प्रक्रिया लवकरच सुरू करणार असल्याचे बोलले जात आहे. चार ते पाच दिवसांत अध्यक्षपदाच्या निवडीची तारीख आणि त्याची प्रक्रिया जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी अध्यक्षपदी गांधी घरण्याबाहेरील व्यक्तीची निवड करण्याबाबत त्यांनी आपले मत व्यक्त केले आहे. यावेळी काँग्रेस अध्यक्षपदाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, 2014 मध्ये सोनिया गांधी (Congress President Sonia Gandhi) आणि 2019 मध्ये माझ्या अध्यक्षतेखाली पक्षाचा पराभव झाला असून या परिस्थितीत पक्षाध्यक्षपदाची जबाबदारी आता इतर व्यक्तींनी घ्यावी असंही त्यांनी सांगितले. काँग्रेस अध्यक्षपदाबाबत बोलताना राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना त्यांनी विनंती करुन सांगितले आहे की, प्रियंका गांधी यांचे नाव काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी घेऊ नका, गांधी घरण्याबाहेरील व्यक्ती काँग्रेस अध्यक्षपदासाठी असावी असंही त्यांनी यावेळी सांगितले.
आता ज्याचे नाव सुचवले जाईल तोच उमेदवार काँग्रेस अध्यक्ष म्हणूनही निवडून यावा अशी इच्छाही त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.
काँग्रेस नेते राहुल-प्रियंकासाठी आग्रही
तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते राहुल गांधींना अध्यक्ष बनवण्याचा प्रयत्न करत असून राहुल गांधी यांच्या नावानंतर काँग्रेसचे काही वरिष्ठ नेते प्रियंका गांधी यांच्याकडेही पर्याय म्हणून बघत आहेत.
अध्यक्ष पदासाठी कोणीही सहभागी व्हा
काँग्रेस अध्यक्षपदासाठी जर राहुल गांधी तयार नसतील तर पक्षाच्या ऐक्यासाठी सोनिया गांधी यांना 2024 पर्यंत पक्षाध्यक्ष पदावर राहण्याची विनंती काँग्रेसमधील नेते करत आहेत. मात्र येत्या 15 दिवसांत काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची अधिसूचना जाहीर होण्याची शक्यता आहे. तर राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष पदासाठी गांधी घराण्याबाहेरील कोणत्याही व्यक्तीचे नाव घ्यायला ते तयार नसले तरी त्यांनी निवडणूक प्रक्रियेत भाग घेऊन कोणीही अध्यक्ष व्हावे असंही त्यांनी मत व्यक्त केले आहे.
काँग्रेस अध्यक्षपदासाठी गांधी घराण्याबाहेरील संभाव्य नावं-
1. अंबिका सोनी 2. अशोक गेहलोत 3. मल्लिकार्जुन खरगे 4. केसी वेणुगोपाल 5. कुमारी सेलजा 6. मुकुल वासनिक
अध्यक्षपदाच्या निवडणुकीची तारीख
काँग्रेसच्या नव्या अध्यक्षांच्या निवडणुकीची प्रक्रिया रविवारपासून सुरू झाली असली तरी त्याच वेळी, पक्षाच्या निवडणूक प्राधिकरणाकडून सांगण्यात आले आहे की, ते 20 सप्टेंबरपर्यंत पक्षाच्या नवीन अध्यक्ष पदाची निवड करण्याच्या प्रक्रियेमध्ये असणार आहेत. काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांनी सांगितले की, 21 ऑगस्ट ते 20 सप्टेंबर या दरम्यान कोणत्याही दिवशी पक्षाध्यक्ष निवडीची अंतिम तारीख जाहीर करण्याचे काम काँग्रेस कार्यकारिणीवर असल्याचेही सांगितले जात आहे.