इतिहासाची पुनरावृत्ती: राहुल गांधींचे आंदोलन खरच इंदिरा गांधींसारखे आहे..?; काय आहेत या फोटोला संदर्भ
मुंबईः काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक फोटो शेअर केला गेला आहे. एका बाजूनला माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Former Prime Minister Indira Gandhi) आंदोलनाला बसल्या आहेत, आणि दुसऱ्या बाजूला इंदिरा गांधी यांचा नातू राहुल गांधी यांचा फोटो आहे. इंदिरा गांधी यांचा फोटो 1977 मधील आहे तर राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा हा फोटो 26 जुलै म्हणजेच […]

मुंबईः काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक फोटो शेअर केला गेला आहे. एका बाजूनला माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Former Prime Minister Indira Gandhi) आंदोलनाला बसल्या आहेत, आणि दुसऱ्या बाजूला इंदिरा गांधी यांचा नातू राहुल गांधी यांचा फोटो आहे. इंदिरा गांधी यांचा फोटो 1977 मधील आहे तर राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा हा फोटो 26 जुलै म्हणजेच आजच आहे. काँग्रेस आता रस्त्यावर उतरून महागाई, बेरोजगारी असे मुद्दे घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल करत आहे. मात्र खरी बाजू ही आहे की, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी ईडी कार्यालयाकडून सतत चौकशी करण्यात येत असल्याने काँग्रेसकडून मोदी सरकारला जोरदार विरोध केला जात आहे.
जंजीर बढ़ा कर साध मुझे, हाँ, हाँ दुर्योधन! बाँध मुझे।
बाँधने मुझे तो आया है, जंजीर बड़ी क्या लाया है?
इतिहास दोहरा रहा है…#SatyagrahaWithSoniaGandhi pic.twitter.com/wroc7cLtk9
— Congress (@INCIndia) July 26, 2022
राहुल गांधीं फोटो काँग्रेसकडून व्हायरल
काँग्रेसच्या खासदारांनी संसदेपासून ते विजय चौकापर्यंत मोर्चाही काढला, आणि त्यानंतर खासदार राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे खासदार या ठिकाणी आंदोलनाला बसले. त्यानंतर दिल्ली पोलिसांकडून काही वेळातच या सगळ्यांना ताब्यात घेतले. त्या आंदोलनातील राहुल गांधी यांचा एक फोटो काँग्रेसकडून प्रचंड व्हायरल केला गेला आहे.
‘इतिहासाची पुनरावृत्ती होते आहे
काँग्रेस पक्षाचे अधिकृत ट्विटर हँडलवरून राहुल गांधींची यांची आजी आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा एक फोटो शेअर करण्यात आला आहे. एका बाजूला माजी इंदिरा गांधी आहेत, तर दुसऱ्या बाजूला आजचे राहुल गांधी आहेत. काँग्रेसच्या सोशल मीडिया टीमने हा फोटो शेअर करताना म्हटले आहे की, ‘इतिहासाची पुनरावृत्ती होते आहे..।’ काँग्रेसकडून आज ईडीविरोधात आंदोलन करण्यात आले असले तरी माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनी सरकारी संस्थांविरोधात कधी आंदोलनाला बसल्या होत्या का? काँग्रेसने इंदिरा गांधी आणि राहुल यांचे फोटो एकत्रितच शेअर करुन लिहिले आहे की, इतिहासाची पुनरावृत्ती होते आहे, त्याबरोबर रामधारी सिंग यांची दिनकर कृष्ण की चेतावनी या कवितेतील काही ओळीही त्यांनी येथे शेअर केल्या आहेत. त्या कवितेत लिहिण्यात आले आहे की,
जंजीर बढ़ा कर साध मुझे, हां, हां दुर्योधन! बाँध मुझे। बांधने मुझे तो आया है, जंजीर बड़ी क्या लाया है?
इंदिरा गांधींचा तो फोटो…
इंदिरा गांधींचा तो फोटो प्रसिद्ध छायाचित्रकार रघू राय यांनी टिपला होता. त्यांचे पुस्तक A Life in the Day of Indira Gandhi या पुस्तकात छापला होता. आंदोलनाला बसलेल्या इंदिरा गांधींचा हा फोटो 1977 च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालानंतर काढलेला होता. इंदिरा गांधींना गुप्तचर संस्थेतील अनेक जणांकडून सांगण्यात आले होते की, मात्र तसं काही झालं नाही. स्वातंत्र्यानंतर काँग्रेस पक्ष पहिल्यांदाच सत्तेतून बाहेर गेला.त्यावेळी इंदिरा गांधी स्वतः रायबरेलीमधून निवडणूक हरल्या होत्या आणि मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्षाचे सरकार स्थापन झाले होते, मात्र मोरारजी देसाईंचे ते सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करू शकले नव्हते आणि काही वर्षांनी इंदिरा गांधी पुन्हा सत्तेवर आल्या ही मात्र वस्तुस्थिती आहे.
महागाईविरोधात आमचे आंदोलन
राहुल गांधी सांगतात की, बेरोजगारी आणि महागाईविरोधात आम्ही आंदोलन करत आहोत, काँग्रेसचे खासदार आणि नेते बेरोजगारी आणि महागाईविरोधात आंदोलन करत आहेत मात्र हे दिल्ली पोलीस आम्हाला आंदोलन करु देत नाहीत, आणि आम्हाला ताब्यात घेत आहेत.
सोनिया गांधींचा फोटो लावला होता
राहुल गांधी यांनी यावेळी सांगत होते की, आमचे हे आंदोलन निषेध महागाई, बेरोजगारी या मूलभूत मुद्द्यांवर आहेत. मात्र त्यांच्याबरोबर असलेल्या काँग्रेस खासदारांच्या हातातील फलकांवर मात्र अंमलबजावणी संचालनालयाच्या विरोधात घोषणा देण्यात होत्या.लोकसभेतील नेते अधीर रंजन चौधरी यांनी सोनिया गांधींचा फोटो लावला होता, ज्यावर ‘सत्यमेव जयते’ असेही लिहिले होते. या आंदोलनात सहभागी असलेल्या काँग्रेसच्या बहुतांश खासदार आणि इतर नेत्यांनी महागाई, बेरोजगारी सोडून ईडीने सोनिया गांधी यांच्या चौकशीच्या विरोधात विधाने केली आहेत.