राहुल गांधी पुन्हा एकदा केंब्रिजमध्ये देणार व्याख्यान; मागच्यावेळी ‘या’ मुद्यावरुन चिघळला होता वाद
केंब्रिज विद्यापीठाने ट्विट केले होते की, राहुल गांधी या महिन्याच्या अखेरीस केंब्रिज विद्यापीठात येणार आहेत. राहुल गांधी केंब्रिज विद्यापीठात येणार असल्याने या गोष्टीचा आम्हाला प्रचंड आनंद होत आहे.
नवी दिल्लीः काँग्रेस नेते राहुल गांधी या महिन्याच्या अखेरीला केंब्रिज विद्यापीठाला भेट देणार आहेत. यावेळीही त्यांना व्याख्यान देण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाकडून बोलावण्यात आले आहे. केंब्रिज विद्यापीठाच्या बिझनेस स्कूलमध्ये भू-राजकीय, भारत-चीन संबंध, बिग डेटा आणि लोकशाही या विषयांवर राहुल गांधी व्याख्यान देणार आहेत. या घटनेची माहिती काँग्रेसच्या नेत्याने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. राहुल गांधी यांनीही ट्विट करून याबाबत त्यांनी म्हटले आहे की, ते आपण शिकलेल्या आपल्या जुन्या संस्थेच्या केंब्रिज विद्यापीठात जाण्यासाठी खूप मी उत्सुक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
केंब्रिज विद्यापीठात भू-राजकीय, आंतरराष्ट्रीय संबंध, बिग डेटा आणि लोकशाही या विषयांवर राहुल गांधी बोलणार असल्याचे राहुल यांनी सांगितले.
Delighted to welcome back @RahulGandhi to @Cambridge_Uni later this month.
He will lecture on @CambridgeMBA and hold closed-door sessions on Big Data and Democracy and India-China relations, with @shrutikapila, supported by @BennettInst @CamGeopolitics @CamHistory. pic.twitter.com/i5S89LdRPH
— Cambridge Judge (@CambridgeJBS) February 16, 2023
यापूर्वी केंब्रिज विद्यापीठाने ट्विट केले होते की, राहुल गांधी या महिन्याच्या अखेरीस केंब्रिज विद्यापीठात येणार आहेत. राहुल गांधी केंब्रिज विद्यापीठात येणार असल्याने या गोष्टीचा आम्हाला प्रचंड आनंद होत आहे.
याशिवाय त्यांनी भारताला राष्ट्र म्हणण्या संदर्भातही बोलण्यात आले आहे. तर काँग्रेस नेत्याने भारताची तुलना युरोपशी केली आहे. ही तुलना केली असली तरी त्यांनी काँग्रेसचे जोरदार कौतुकही केले होते.
भारताच्या राजकारणात बदल पाहायचा असल्याचेही मतही व्यक्त करण्यात आले आहे. त्याबरोबरच भारताच्या राजकारणात त्यांच्या पक्षात अधिकाधिक तरुणांनाही संधी द्यायची असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
केंब्रिज युनिव्हर्सिटीने सांगितले की, राहुल गांधी श्रुती कपिलासोबत बिग डेटा आणि डेमोक्रसी आणि भारत-चीन संबंधांबद्दल चर्चा करणार आहेत. श्रुती कपिला या केंब्रिज विद्यापीठात इतिहासाच्या सहयोगी प्राध्यापक आहेत.
राहुल गांधी गेल्या वर्षी मे महिन्यात केंब्रिज विद्यापीठात व्याख्यान देण्यासाठी आले होते, त्यावेळी त्यांच्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला होता.
त्यावेळी राहुल गांधी यांनी केंब्रिज विद्यापीठातील ‘आयडियाज ऑफ इंडिया’ परिषदेत त्यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यावेळी त्यांनी सांगितले होते होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संसद आणि निवडणूक आयोगासारख्या महत्वाच्या संस्थांना भारतात काम करू देत नाहीत.
यावेळी राहुल गांधी यांच्या वक्तव्याबाबत भाजपने राहुल गांधी आणि काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला होता. यावेळी राहुल गांधी यांनी भारत आणि चीनमधील वाढत्या बेरोजगारीच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवरही जोरदार टीका केली होती.