पैशांचा तुटवडा, किडनी आणि लिव्हरचे उपचार परवडेना, राहुल गांधी 1,000 रुग्णांची जबाबदारी घेणार

काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी आपला मतदारसंघ वायनाडमधील 1,000 रुग्णांच्या संपूर्ण उपचाराची जबाबदारी उचलली आहे (Rahul Gandhi took responsibility of kidney and liver patients).

पैशांचा तुटवडा, किडनी आणि लिव्हरचे उपचार परवडेना, राहुल गांधी 1,000 रुग्णांची जबाबदारी घेणार
Follow us
| Updated on: Apr 29, 2020 | 12:47 AM

नवी दिल्ली : देशभरात कोरोनाचं थैमान सुरु असताना संपूर्ण आरोग्य यंत्रणा कोरोना संसर्ग रोखण्याच्या कामी गुंतली आहे. अशातच किडनी आणि लिव्हरसारख्या आजारांनी ग्रस्त रुग्णांची समस्या वाढली आहे. अनेक रुग्ण महागडे उपचार आणि लॉकडाऊनमुळे असलेला पैशांचा तुटवडा या कात्रीत अडकले आहेत. अनेकांना तर उपचार घेणेही शक्य नाही, अशी कठीण परिस्थिती तयार झाली आहे. हाच मुद्द लक्षात घेऊन काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी आपला मतदारसंघ वायनाडमधील 1,000 रुग्णांच्या संपूर्ण उपचाराची जबाबदारी उचलली आहे (Rahul Gandhi took responsibility of kidney and liver patients).

राहुल गांधी यांनी मंगळवारी (28 एप्रिल) आपला लोकसभा मतदारसंघ वायनाडमधील नेत्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. यात मतदारसंघातील अनेक किडनी आणि लिव्हर रुग्णांना लॉकडाऊनमुळे उपचार घेणं शक्य होत नसल्याचा मुद्दा उपस्थित झाला. यानंतर राहुल गांधी यांनी तात्काळ अशा 1 हजार रुग्णांच्या उपचाराची जबाबदारी घेतली. किडनी आणि लिव्हरचे उपचार बरेच महागडे असतात. त्यात लॉकडाऊनमुळे हातात असलेलं कामही गमावलेल्या नागरिकांना असा खर्चिक उपचार घेणं अशक्य होत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आपल्या मतदारसंघातील ही बाब समजताच राहुल गांधी यांनी वाडनाडमधील नेत्यांसोबतच्या बैठकीत या रुग्णांसाठी मदतीची तयारी दाखवली. तसेच 1,000 रुग्णांची संपूर्ण उपचाराची जबाबदारी घेत असल्याचं जाहीर केलं.

राहुल गांधींसोबत झालेल्या या बैठकीत काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी वाडनाडमध्ये नागरिकांना मास्क, रेशन, सॅनिटायझर आणि इतर वस्तूंचा पुरवठा केला जात असल्याचीही माहिती राहुल गांधींना दिली. या बैठकीत वाडनाडमधील अनेक नागरिक परदेशात अडकून पडल्याचाही मुद्दा चर्चेत आला. वायनाडच्या स्थानिक नेत्यांनी परदेशात अडकून पडलेल्या नागरिकांना आपल्या घरी आणण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा करावी अशी राहुल गांधींना विनंती केली. राहुल गांधी यांनी यावेळी वायनाडमधील लॉकडाऊनच्या स्थितीचाही आढावा घेतला. ही बैठक जवळपास 2 तास चालली.

संबंधित बातम्या :

राज्यात दिवसभरात तब्बल 729 नवे रुग्ण, बाधितांचा आकडा 9,318 वर

मुंबईत आज 393 कोरोना रुग्णांची भर, एकूण आकडा 6 हजार 169 वर

Pune Corona Update | …तर 18 मेपर्यंत पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या 9600 पोहोचण्याचा अंदाज : आयुक्त

मालेगावात दिवसभरात तब्बल 48 नवे रुग्ण, बाधितांचा आकडा 171 वर

Rahul Gandhi took responsibility of kidney and liver patients

'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.