राहुल गांधी यांना भारत जोडो यात्रेत झाला होता हा त्रास, केरळात सुरु होते आठवडाभर उपचार

राहुल गांधी यांनी चार हजार किमीची भारत जोडो यात्रा केली. त्यामुळे त्यांना रोज सहा ते सात किमी अंतर चालावे लागायचे. त्याचा त्रासही झाला.

राहुल गांधी यांना भारत जोडो यात्रेत झाला होता हा त्रास, केरळात सुरु होते आठवडाभर उपचार
rahul gandhi Image Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Jul 30, 2023 | 8:53 PM

केरळ | 30 जुलै 2023 : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची चार हजार किमीची भारत जोडो यात्रा केली. परंतू ही यात्रा करताना त्यांना दुखणं जडलं होतं. त्यामुळे राहुल गांधी यांनी केरळच्या प्रसिद्ध कोट्टक्कल आर्य वैद्यशाळेमध्ये आठवडाभर उपचारा केल्यानंतर त्यांना आता बरे वाटू लागल्याने त्यांची या आर्युर्वेदिक रुग्णालयातून सुटका झाली आहे. त्यांनी रुग्णालयात काळजी घेणाऱ्या डॉक्टर आणि स्टाफचे आभार मानले आहे.

राहुल गांधी यांनी चार हजार किमीची भारत जोडो यात्रा केली. त्यामुळे त्यांना रोज सहा ते सात किमी अंतर चालावे लागायचे. त्याचा त्रासही झाला. त्यांना गुडघे दुखीला सामोरे जावे लागले. त्यामुळे त्यांनी केरळ येथील प्रसिद्ध आयुर्वेदिक संस्थानात आपल्या गुडघ्यावर उपचार केले. राहुल गांधी यांनी फेसबुक पोस्टवर लिहीले की रुग्णालयात काही दिवस राहील्यानंतर मला आता ताजेतवाने वाटत आहे. त्यांनी रुग्णालयातील वास्तव्या दरम्यान त्यांची काळजी घेणाऱ्या प्रेमाने सुश्रृषा करणाऱ्या वैद्यक आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत.

कर्मचाऱ्यांचे हार्दिक धन्यवाद

फेसबुकच्या पोस्टमध्ये राहुल गांधी लिहीतात की, कोट्टक्कल मधील आर्य वैद्यशाळेतील माझा अनुभव मला ताजातवाना करणारा आहे. माझी काळजी घेणाऱ्या आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या डॉ. पी. एम. वेरियर आणि त्यांच्या टीम तसेच रुग्णालयाच्या अन्य कर्मचाऱ्यांचे हार्दिक धन्यवाद देत आहे.

भारत जोडो यात्रा काय होती

कन्याकुमारीपासून सुरु झालेली राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा श्रीनगरमध्ये समाप्त झाली होती. 12 राज्ये आणि 2 केंद्र शासित प्रदेशतातून ही यात्रा गेली.राहुल गांधी यांनी या यात्रेत 3 हजार 570 किलोमीटरचा प्रवास रात्रीचा मुक्काम करीत पायी केला होता. गेल्यावर्षी 7 डिसेंबर रोजी कन्याकुमारी येथून सुरु झालेली ही भारत जोडो यात्रा 30 जानेवारी रोजी 146 दिवसांनी संपली.

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर.
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य.
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'.
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'.
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?.
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड.
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा.
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी.
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक.
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद.