Rahul Gandhi : राहुल गांधी ज्या मैत्रिणीच्या लग्नात नेपाळला गेले, तीला भारतविरोधी का म्हटले जात आहे?
नवी दिल्ली : देशात भोंगा, मशीद, हनुमान चालीसावरून राजकारण तापलेले आहे. तर देशात सर्वात जुन्या असणाऱ्या काँग्रेस पक्षाला उतार कळा लागलेली असतानाच काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) हे नेपाळ दौऱ्यावर आहेत. त्यातच त्यांचा पबमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. त्यावरूनही आता राजकारण सुरु झालं आहे. तर या व्हिडीओवरून (Video Viral) […]
नवी दिल्ली : देशात भोंगा, मशीद, हनुमान चालीसावरून राजकारण तापलेले आहे. तर देशात सर्वात जुन्या असणाऱ्या काँग्रेस पक्षाला उतार कळा लागलेली असतानाच काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) हे नेपाळ दौऱ्यावर आहेत. त्यातच त्यांचा पबमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. त्यावरूनही आता राजकारण सुरु झालं आहे. तर या व्हिडीओवरून (Video Viral) भाजपने हल्लाबोल केला असून काँग्रेसकला याचे स्पष्टीकरण द्यावे लागत आहे. त्यातच राहुल गांधी ज्या मैत्रिणीच्या विवाहासाठी गेले आहेत. त्याच लग्नाला त्यांची मैत्रिण सुम्निमा उदास हिने हजेरी लावली. जी नेपाळच्या नव्या नकाशावरून (Map Row in Nepal) वादग्रस्त ठरली आहे. तसेच सुम्निमा उदास यांनी भारताच्या अखंडतेला आव्हान देणार्या अनेक भारतविरोधी गोष्टी सांगितल्याचा आरोप आता भाजप नेत्यांनी केला आहे. त्यामुळे तीला भारतविरोधी म्हटले जात आहे.
सीएनएन इंटरनॅशनलमध्ये बातमीदार म्हणून काम करणाऱ्या सुम्निमा उदास यांच्याबद्दल भाजप नेत्यांनी अनेक ट्विट केली आहेत. ज्यात 2020 सालातील एका बातमीचा स्क्रीनशॉट शेअर करण्यात आला आहे. या ‘भारतविरोधी’ भावनेला सुमनिमा यांनी पाठिंबा दिल्याचा दावा करण्यात आला.
सुमनीमाचे ट्विट
In a world of alternative facts India has made Limpiyadhura, Lipulekh and Kalapani their ‘fact’. It would be prudent for the Indian media to stop gaslighting Nepal with its patronizing preconceived narrative. pic.twitter.com/w4S0ObkE3b
— Sumnima Udas (@sumnima_udas) May 21, 2020
पुरावा म्हणून ट्विट
भाजपचे आयटी सेलचे प्रभारी अमित मालवीय यांनी आपल्या ट्विटमध्ये राहुल गांधींवर आरोप केले. त्यांनी लिहिले, ‘राहुल गांधी उत्तराखंडच्या प्रदेशांवर नेपाळच्या हक्काच्या बाजूने असलेल्या नेपाळी राजनयिकाची मुलगी सुम्निमा उदास यांच्या लग्नाला उपस्थित होते. चीनपासून नेपाळपर्यंत भारताच्या प्रादेशिक अखंडतेला आव्हान देणार्यांचीच राहुलना काळजी का आहे?
Nepal issues a new map… should have been done decades ago. Thank you for the write-up @SugamCNN https://t.co/2ImKrmXUVU
— Sumnima Udas (@sumnima_udas) May 22, 2020
Rahul Gandhi was supposedly at the wedding of Sumnima Udas, a Nepali diplomat’s daughter, who actively supports Nepal’s claim over regions of India’s Uttarakhand.
From China to Nepal, why does Rahul have ties only with those who are challenging India’s territorial integrity? pic.twitter.com/or0y1OGdAW
— Amit Malviya (@amitmalviya) May 4, 2022
त्याचवेळी भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनीही राहुल गांधींवर आरोप केले आहेत. तसेच त्यांनी आपल्या ट्विटमध्ये चीनसोबतचा सामंजस्य करार, डोकलाम दरम्यान गुप्त बैठक, 370 वरील पाकिस्तानची रेषा, सर्जिकल स्ट्राइक, पुलवामाचा प्रश्न यासारख्या गोष्टींचा उल्लेख करत पूनावाला यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. त्याचबरोबर पूनावाला यांनी लिहले की, ‘राहुल गांधी भारताच्या अखंडतेला आव्हान देणाऱ्या व्यक्तीच्या लग्नाला गेले? भारतविरोधी सुम्निमा उदास यांच्या लग्नात राहुल पार्टी करत होते का, हे काँग्रेसने स्पष्ट करावे?’
Rahul Gandhi was at wedding of someone who challenges India’s territorial integrity ? Congress must clarify was Rahul partying at anti India baitor Sumnima Udas’ wedding ?
MoU with China, secret meet during Doklam, echoing line of Pak on 370,Surgical strike, blaming Pulwama pic.twitter.com/FyhgdcPlFF
— Shehzad Jai Hind (@Shehzad_Ind) May 4, 2022
कोण आहे राहुलची मैत्रीण सुम्निमा उदास?
सीएनएनमध्ये काम करणारी सुम्निमा उदास ही भीम उदास यांची मुलगी आहे. जे म्यानमारमध्ये नेपाळचे राजदूत होते. तर सुम्निमाने अमेरिकेतील विद्यापीठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवी आणि ऑक्सफर्ड विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी घेतली आहे. सुमनिमाने तिच्या पत्रकारितेच्या व्यवसायात अनेक पुरस्कारही जिंकले आहेत. त्या सध्या लुंबिनी संग्रहालय उपक्रमाच्या संस्थापक आणि कार्यकारी संचालक आहेत.
पहचान कौन ? Who are they ? pic.twitter.com/IDKBkjSg5A
— Kapil Mishra (@KapilMishra_IND) May 3, 2022
राहुल यांचा नेपाळ दौरा
विशेष म्हणजे सुम्निमा उदास यांच्या लग्नात सहभागी होण्यासाठी राहुल गांधी सोमवारी काठमांडूला पोहोचले. दरम्यान, त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यामध्ये ते एका महिलेसोबत नाईट क्लबमध्ये दिसत होते. भाजपच्या अनेक नेत्यांनी दावा केला की त्यांच्यासोबत दिसलेली महिला चिनी मुत्सद्दी हौ यानकी आहे. तथापि, इंडिया टुडे/आज तकला हा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे.
वादग्रस्त पत्रकार
राहुल गांधी ज्या मैत्रिणीच्या विवाहासाठी गेले आहेत, त्या वादग्रस्त पत्रकार आहेत. 2020 मध्ये जेव्हा नेपाळचा नवा नकाशा तयार करण्यात आला होता, त्यावेळी सुम्रिमा यांनी वादग्रस्त वक्तव्य होते. त्यामुळे त्या वादात सापडल्या होत्या.
नेपाळचा भारताच्या त्या भागावर दावा
नेपाळकडून जो नकाशा तयार करण्यात आला आहे, त्यामध्ये भारतातील उत्तराखंडमधील काही भागांचा समावेश आहे. लिपुलेख, कालापानी आणि लिंपियाधुरा या भागावर नेपाळकडून दावा केला गेला आहे. भारताच्यादृष्टीने हा भाग महत्वाचा आहे.