Rahul Gandhi : राहुल गांधी असतील लोकसभेत विरोधकांचा चेहरा? गोटातील माहिती काय? मग कोण असणार दावेदार

Rahul Gandhi Opposition Leader : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना लोकसभेत विरोधी पक्षनेते पदासाठी गळ घालण्यात आली आहे. पण काही मीडिया हाऊसच्या म्हणण्यानुसार राहुल गांधींनी या पदासाठी अजून भूमिका जाहीर केलेली नाही.

Rahul Gandhi : राहुल गांधी असतील लोकसभेत विरोधकांचा चेहरा? गोटातील माहिती काय? मग कोण असणार दावेदार
Rahul Gandhi
Follow us
| Updated on: Jun 14, 2024 | 3:05 PM

लोकसभेत भाजप नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला 300 जागांच्या रोखण्यात इंडिया आघाडीला मोठे यश आले. राहुल गांधी यांच्यासह इंडिया आघाडीतील अनेक नेत्यांनी त्यासाठी मोठी मेहनत घेतली. काँग्रेसने निवडणुकीत चांगली कामगिरी दाखवली. त्यामुळे लोकसभेत विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी यांचे नाव पुढे करण्यात आले आहे. काही मीडिया हाऊसच्या मते, राहुल गांधी यांनी याविषयीची भूमिका जाहीर न केल्याने या स्पर्धेत इतर चेहरे दिसू शकतात. एबीपीच्या वृत्तानुसार, राहुल गांधी सध्या पक्ष संघटन सक्षम करण्यावर काम करत आहेत.

कोण-कोण रेसमध्ये?

सूत्रांच्या माहितीनुसार, राहुल गांधी जर विरोधी पक्षनेते झाले नाहीत तर इतर नेत्यांची नावे या स्पर्धेत सर्वात पुढे आहेत. केसी वेणुगोपाल, गौरव गोगोई, मनीष तिवारी, शशि थरूर आणि कुमारी शैलजा यापैकी एकाची या पदासाठी वर्णी लागू शकते. कुमारी शैलजा या स्पर्धेत सर्वात पिछाडीवर आहेत. सध्या काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते पदी मल्लिकार्जुन खरगे आहेत. ते मागास समाजातील असल्याने, लोकसभेत ही संधी दुसऱ्या व्यक्तीला मिळण्याची शक्यता आहे. दिल्लीत काँग्रेस कार्य समितीच्या बैठकीत राहुल गांधी यांना विरोधी पक्ष नेते करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता.

हे सुद्धा वाचा

देशाचा आवाज लोकसभेत

गौरव गोगोई यांनी राहुल गांधी विरोधी पक्षनेते असण्यावर भर दिला. जेव्हा पण काँग्रेस पक्षाने राहुल गांधी यांच्याकडे काही मागितले आहे, अपेक्षा केली आहे, तेव्हा त्यांनी पक्षाची इच्छा पूर्ण केली आहे. आज काँग्रेसची इच्छा आहे की त्यांनी देशाचा आवाज लोकसभेत पोहचवावा, असे गोगाई म्हणाले.

काँग्रेसला मोठा फायदा

राहुल गांधी यांनी गेल्या वर्षभरात देश पिंजून काढला. त्यांनी यापूर्वी भारत जोडो यात्रा काढली. या यात्रेला कार्यकर्ते, जनतेने मोठा प्रतिसाद दिला. दक्षिण ते उत्तर भारतापर्यंत त्यांची ही यात्रा गेली. त्यात त्यांनी अनेक भागातील लोकांशी संवाद साधला. सभा घेतल्या. मोदी सरकारविरोधात वातावरण तयार करण्यात या यात्रेने मोठे योगदान दिले. त्यानंतर त्यांनी न्याय यात्रा काढली. पूर्व ते पश्चिम अशी ही यात्रा होती. या यात्रेत अनेक विघ्न आणण्याचे प्रयत्न झाले. अनेक नेते राहुल गांधी यांची सोबत सोडून गेले. पण त्याचा परिणाम लोकसभेत दिसून आला.

काँग्रेसच्या अनेक नेत्यांना राहुल गांधी हे लोकसभेत विरोधी पक्षनेते पदी हवे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात विरोधकांचा सक्षम आवाज म्हणून राहुल गांधी योग्य भूमिका मांडतील असा विश्वास अनेक नेत्यांना वाटत आहे. त्यामुळे राहुल गांधी यांना विरोधकांचा चेहरा होण्याची गळ घालण्यात आली आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.