खासगी कंटेनरमध्ये 150 दिवस रात्र काढणार राहुल गांधी, भारत जोडो यात्रेत इतरांसाठी व्यवस्था काय?
कन्याकुमारी ते काश्मीर अशी ही पदयात्रा आहे. 3 हजार 570 किलोमीटर अंतर जायचं आहे. 150 दिवसांत ही यात्रा 12 राज्य आणि केंद्र शासित प्रदेशातून जाईल.
काँग्रेस पक्षानं राहुल गांधींसह 119 नेत्यांना भारत यात्री असं नाव दिलंय. हे काँग्रेसचे भारत यात्री कन्याकुमारी येथून कश्मीरपर्यंत पदयात्रा करतील. 3 हजार 570 किलोमीटरची अशी ही यात्रा राहणार आहे. काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांच्यासह 230 यात्री हे 60 कंटेनरमध्ये रात्री आराम करतील. रोज या कंटेनरला ट्रकच्या माध्यमातून दुसऱ्या ठिकाणी हलविण्यात येईल. पक्षाचे महासचिव जयराम रमेश यांनी ही माहिती दिली. रमेश म्हणाले की, भारत जोडो यात्रेसाठी 60 कंटेनर तयार आहेत. सात सप्टेंबरला यात्रेची सुरुवात झाली.
पहिल्या दिवशी राहुल गांधी यांच्यासह 230 लोकं थांबले होते. या कंटेनरमध्ये 2,4, 6 आणि 12 असे बेड लावले होते. मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करण्यात आली होती.
यात्रेतील लोकं दुसऱ्या दिवशी ज्या ठिकाणी जातील, त्या ठिकाणी कंटेनर पाठविले जातील. राहुल गांधी हे एसी असलेल्या कंटेनरमध्ये आराम करतील. इतर लोकं हे शेअरिंगवाल्या कंटेनरमध्ये थांबतील.
वरिष्ठ नेते दोन बेडवाल्या कंटेनरमध्ये थांबतील. सर्व कंटेनरमध्ये एसीची सुविधा नाही. परंतु, बहुतेक सर्व कंटेनरला टॉयलेट अटॅच आहेत.
119 भारत यात्री, अतिथी यात्री आणि प्रदेश यात्री जुळलेले आहेत. तसेच सुरक्षेशी संबंधित लोकं राहतील. कंटेनरमध्ये टीव्ही नाही. पण, पंखा आहे.
कन्याकुमारी ते काश्मीर अशी ही पदयात्रा आहे. 3 हजार 570 किलोमीटर अंतर जायचं आहे. 150 दिवसांत ही यात्रा 12 राज्य आणि केंद्र शासित प्रदेशातून जाईल.
काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचे समन्वय समितीचे प्रमुख दिग्विजय सिंह म्हणाले, कंटेनर एका रेल्वेगाडीच्या स्लीपर डब्यासारखं आहे. रोज ध्वजवंदन, वंदे मातरम आणि राष्ट्रगीतानं यात्रेला सुरुवात होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.