वायनाड येथून राहुल गांधी उभे राहणार, पण समोर असणार CPI च्या ॲनी राजा ? मित्रासोबत कॉंग्रेसची लढत ?

वायनाड येथून कॉंग्रेसच्या पहील्या यादीत राहुल गांधी यांचे नावे लोकसभेसाठी जाहीर करण्यात आले आहे. केरळातील सत्ताधारी एलडीएफमध्ये सहभागी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या ॲनी राजा आणि राहुल गांधी यांच्या लढत मोठी रंजक होणार आहे. गेल्यावेळी वायनाडमधून राहुल गांधी चार लाखांच्या मताधिक्क्याने जरी निवडून आले असले तरी आता त्यांना मोठे आव्हान आहे.

वायनाड येथून राहुल गांधी उभे राहणार, पण समोर असणार CPI च्या ॲनी राजा ? मित्रासोबत कॉंग्रेसची लढत ?
anni raja and rahul gandhi Image Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Mar 08, 2024 | 10:09 PM

नवी दिल्ली | 8 मार्च 2024 : कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी पुन्हा केरळच्या वायनाड येथून लोकसभा निवडणूक लढविणार आहेत. कॉंग्रेसच्या पहिल्या यादीत त्यांचे नाव जाहीर केले आहे. त्यामुळे इंडिया आघाडीतच वायनाड सिटवर मित्र पक्षातच लढत होणार आहे. केरळात सत्ताधारी लेफ्ट डमोक्रेटिक फ्रंट ( LDF ) मध्ये सहभागी भारतीय कम्युनिस्ट पार्टीने याआधीच लोकसभेचे उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे केरळच्या वायनाड सिटमधून सीपीआयने ॲनी राजा यांना लोकसभेच्या निवडणूकांसाठी उतरविले आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते ना सीपीआयने एनी राजा यांना उभे करण्यापूर्वी कॉंग्रेसला विचारले असेल आणि ना कॉंग्रेसने राहुल गांधी यांची उमेदवारी जाहीर करण्यापूर्वी सीपीआयला विचारले असेल…

राहुल गांधी आणि ॲनी राजा यांची आमने-सामने निवडणूक होणे खूपच रंजक ठरणार आहे. ॲनी राजा सीपीआयचे सरचिटणीस डी.राजा यांच्या पत्नी आहेत. तसेच सीपीआयच्या राष्ट्रीय महिला फेडरेशनच्या देखील सरचिटणीस आहेत. तसेच त्या सीपीआयच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्य देखील आहेत. ॲनी राजा यांनी सीपीआयमध्ये अनेक जबाबदाऱ्या पार पडल्या आहेत. परंतू त्या प्रथमच लोकसभा निवडणूक लढवित आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे.

येथील परिस्थिती वेगळी आहे ?

वायनाड लोकसभा सीटमधून ॲनी राजा यांना काही दिवसांपूर्वी उमेदवार घोषीत केले होते तेव्हा त्यांचे मानने होते की केरळच्या राजकीय स्थितीला इंडीया ब्लॉक हून वेगळी आहे. ॲनी राजा यांचे म्हणणे होते की केरळातील लढाई लेफ्ट डमोक्रेटिक फ्रंट ( LDF ) एडीएफ विरुध्द काँग्रेसप्रणित युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट युडीएफ अशी आहे. परंतू उत्तरेच्या राजकारणात दोन्ही पक्ष इंडीया आघाडीत एकत्र आहेत. त्यामुळे नैतिकदृष्ट्या कार्यकर्त्यांना आदेश देणे कठीण होणार आहे.

यावेळी राहुल गांधींना आव्हान ?

कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी गेल्या निवडणूकीत वायनाड येथील चार लाखांच्या मतांच्या फरकाने जरी निवडून आले असले तरी यंदा राहुल गांधी यांना सहज विजय मिळणे कठीण असल्याचे म्हटले जात आहे. सीपीएमच्या नेतृत्वाखाली एलडीएफमध्ये सीपीआयला केरळमध्ये 20 जागा पैकी चार जागा मिळाल्या आहेत. म्हणजे शशी थरुर यांच्या सीटवरही सीपीआयचा उमेदवार असणार आहे.

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.