नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकार आणि पर्यायानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. एका ट्वीटमध्ये हिंदीमधील काही खास म्हणींचा वापर करुन राहुल गांधी यांनी केंद्र सरकार कशाप्रकारे तपास यंत्रणा आणि देशातील जनतेला वेठीस धरत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.(Rahul Gandhi’s serious allegations against the central government)
राहुल गांधी यांनी आयकर विभाग (Income Tax Department), सक्तवसुली संचालनालय (enforcement directorate) आणि केंद्रीय तपास यंत्रणा (central bureau of investigation) याबाबत ‘उंगलियों पर नचाना’ या म्हणीचा वापर करत केंद्र सरकार या तिन विभागांना आपल्या बोटांवर नाचवत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केंद्र सरकारकडून केला जात असल्याचा आरोप यापूर्वीही अनेकदा झाला आहे. काँग्रेसच्या काळातही असे आरोप अनेकदा झाले होते.
राहुल गांधी यांनी माध्यमांबाबतही एक म्हण लिहिली आहे. माध्यमं ही पंतप्रधान मोदी यांचे मित्र असल्याचं राहुल गांधी म्हणालेत. मोदींसमोर माध्यमं भीगी बिल्ली बनतात असा गंभीर आरोप केला आहे. त्याचबरोबर ‘खिसियानी बिल्ली खंबा नोचे’ या म्हणीचा वापर करुन सरकार आपला राग शेतकरी नेते आणि त्यांच्या समर्थकांवर छापे टाकून काढत असल्याची टीकाही राहुल गांधी यांनी केली आहे.
कुछ मुहावरे:
उँगलियों पर नचाना- केंद्र सरकार IT Dept-ED-CBI के साथ ये करती है।
भीगी बिल्ली बनना- केंद्र सरकार के सामने मित्र मीडिया।
खिसियानी बिल्ली खंबा नोचे- जैसे केंद्र सरकार किसान-समर्थकों पर रेड कराती है।#ModiRaidsProFarmers
— Rahul Gandhi (@RahulGandhi) March 4, 2021
बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू आणि निर्माता-दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या कार्यालयांवर काल आयकर विभागानं धाड टाकली. तसंच त्यांची आज चौकशीही करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी हे ट्वीट करुन सरकारवर जोरदार टीका केल्याचं बोललं जात आहे. दरम्यान ही कारवाई फँटम फिल्म्स विरोधातील कर चोरीच्या तपासाचा एक भाग असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
ही छापेमागी मुंबई आणि पुण्यातील 30 ठिकाणी करण्यात आली. त्यात रिलायन्स एन्टरटेन्मेंट ग्रुपचे सीईओ शुभाशीष सरकार आणि केडब्ल्यूएएन कंपनीच्या काही अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.
संबंधित बातम्या :
राहुल गांधी माफी मागता-मागता थकतील, पण त्यांच्या गुन्ह्यांची गणती संपणार नाही- मुख्तार अब्बास नक्वी
Rahul Gandhi’s serious allegations against the central government