Rail Accident : अपघात सत्रामुळे रेल्वे प्रवाशांच्या मनात धडकी, सुरक्षित इच्छित स्थळी पोहचू का?, याचीच लागली चिंता

गेल्या काही दिवसांपासून देशात सुरक्षित रेल्वे प्रवासाविषयी प्रवाशांना चिंता वाटत असल्याचे चित्र आहे. सातत्याने होणारे रेल्वेचे अपघात त्याला कारणीभूत आहे. आपण इच्छित स्थळी सुखरूप पोहचू का, अशी त्यांची चिंता आहे.

Rail Accident : अपघात सत्रामुळे रेल्वे प्रवाशांच्या मनात धडकी, सुरक्षित इच्छित स्थळी पोहचू का?, याचीच लागली चिंता
Railway Accident Series
Follow us
| Updated on: Jul 31, 2024 | 4:49 PM

भारतीय रेल्वे (Indian Railways) ही दळणवळणाची सर्वात स्वस्त आणि किफायतशीर साधन आहे. आता पण देशातील जवळपास 98 टक्के लोक रेल्वेने प्रवास करतात. देशात रेल्वेची अपघात मालिका सुरु आहे. अपघात सत्रामुळे रेल्वे प्रवाशांच्या मनात धडकी भरली आहे. इच्छित स्थळी सुरक्षित पोहचू का, अशी चिंता प्रवाशांना लागलेली आहे. याविषयी लोकल सर्किल नावाच्या संस्थेने एक सर्वेक्षण केले आहे.

काय आहे नाराजी

त्यानुसार, प्रत्येक दुसरा प्रवासी हा घाबरलेला आहे. त्यांना आपण इच्छित स्थळी पोहचू की नाही, याची भीती वाटत असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे. इतकेच नाही तर प्रवासी रेल्वेतील अस्वच्छेतेवरुन पण नाराज आहेत. तर ट्रेनमधील भोजनावर पण अनेक प्रवासी नाखूष असल्याचे या सर्वेमध्ये समोर आले आहे. ट्रेनमधील खाद्यपदार्थांचा दर्जा चिंताजनक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. काय म्हणतो हा लोकल सर्किल सर्व्हे?

हे सुद्धा वाचा

वेळेवर कधी धावणार रेल्वे?

काही मुख्य ट्रेन आणि महागडे भाडे वसूल करणाऱ्या ट्रेन वगळता इतर सर्व रेल्वे या कधीच वेळेवर धावत नसल्याचा दावा लोकल सर्किल सर्वेत करण्यात आल्याचे वृत्त एनबीटीने दिले आहे. अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वे या कधीच वेळेत धावत नसल्याचे सर्वेक्षणात प्रवाशांनी सांगितले. त्यामुळे प्रवाशांचे नियोजन हुकते. काहींना दुसरी रेल्वे गाठायची असते. पण या गडबडीमुळे दुसरी रेल्वे सुटून जाते. त्यानंतर पुढील रेल्वेसाठी बराच वेळ वाट पाहत राहावे लागत असल्याचे सर्वेमध्ये म्हटले आहे.

रेल्वेतील स्वच्छेतेवरुन पण प्रवासी नाराज आहेत. टॉयलेटमधील अस्वच्छता अनेकांच्या चिंतेचा विषय आहे. तर ट्रेनमधील भोजनावर पण अनेक प्रवासी नाखूष असल्याचे या सर्वेमध्ये समोर आले आहे. ट्रेनमधील खाद्यपदार्थांचा दर्जा चिंताजनक असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.

61 हजार प्रवाशांनी मांडले मत

लोकल सर्वेचे संस्थापक सचिन तापाडिया यांनी या सर्वेमध्ये देशातील 378 जिल्ह्यातील जवळपास 61 हजार प्रवाशांचे मत नोंदवले. त्यांच्या प्रतिक्रिया नोंदवल्या. या प्रवाशांना गत तीन वर्षांतील त्यांच्या प्रवासाविषयी माहिती विचारण्यात आली. या सर्वेनुसार, प्रवास करताना प्रत्येक दोन पैकी एका प्रवाशाला आता सुरक्षेविषयी चिंता होत आहे. तर त्यांची स्वच्छता आणि अन्नाच्या दर्जाबाबत चिंता आहे.

सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.