Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Railway News : आता ट्रेनची टक्कर होणार नाही, ओदिशा ट्रेन दुर्घटनेनंतर कवच यंत्रणेसाठी रेल्वेचे टेंडर

ओदिशा ट्रेन अपघातानंतर या मार्गावर कवच यंत्रणा नसल्याची गंभीर बाब उघडकीस आल्याने रेल्वेवर टीका झाली होती. आता रेल्वे कवच यंत्रणेसाठी टेंडर काढण्याच्या तयारीत आहे.

Railway News : आता ट्रेनची टक्कर होणार नाही, ओदिशा ट्रेन दुर्घटनेनंतर कवच यंत्रणेसाठी रेल्वेचे टेंडर
ashwini-vaishnawImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Jun 30, 2023 | 8:46 PM

नवी दिल्ली : ओदिशा रेल्वे अपघातानंतर ( Odisha Train Accident ) रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचे दावे पोकळ ठरले होते. वंदेभारत सारख्या मोजक्याच गाड्यांमध्ये टक्कर विरोधी यंत्रणा सुरक्षा कवच उपलब्ध असल्याचेही उघड झाले होते. त्यामुळे चहुबाजूंनी होणाऱ्या टीकेमुळे रेल्वेने कवच यंत्रणा ( Kavach systems ) अनेक ट्रेनला लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय रेल्वे ( Indian Railway ) आणि डेडीकेटेड फ्रेड कॉरीडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडीया ( DFCCIL ) ऑगस्ट अखेर कवच सिस्टीमसाठी मोठे टेंडर काढणार आहे. यामुळे 650 किमीचा मालगाडी मार्ग कव्हर होणार आहे.

2 जून रोजी ओदिशा येथील बालासोर जिल्ह्यात ट्रेन भीषण टक्कर होऊन झालेल्या अपघातात जवळपास तीनशेच्या आसपास प्रवासी ठार तर अकराशे अधिक प्रवासी जखमी झाले होते. या मार्गावर कवच यंत्रणा नसल्याची गंभीर बाब उघडकीस आल्याने रेल्वेवर टीका झाली होती. डीएफसीसीआयएलच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की सरकार मालगाडीच्या मार्गावर कोलीजन अवॉईडंस सिस्टीम ( TCAS ) लावण्याची योजना आखत आहे. यासाठीचे पहिले टेंडर ऑगस्ट महिन्यात काढण्यात येईल.

येथे लागणार कवच यंत्रणा 

कवच यंत्रणेला पश्चिमी डेडीकेटेड फ्रेट कॉरीडॉरच्या रेवाडी-मदार सेक्शन आणि पूर्व डेडीकेटेड फ्रेट कॉरीडॉरच्या खुर्जा-भाऊपूर सेक्शनमध्ये लावण्यात येणार आहे. एका अन्य अधिकाऱ्याने म्हटले की या सेक्शनमध्ये ट्रेन अतिशय वेगाने चालविण्यात येत असतात आणि सर्वात जास्त ट्रॅफीक देखील असते.

कवचचा खर्च प्रति किमी 50 लाख

कवच सिस्टमला बसविण्याचा खर्च प्रति किमी 50 लाख रुपये येतो. यानूसार 650 किमी मार्गासाठी जवळपास 350 कोटी रुपयांचे टेंडर काढण्यात येणार आहे. डीएफसीसीआयएलची या मार्गावर जानेवारी 2024 पर्यंत कवच यंत्रणा बसविण्याची योजना आहे. पश्चिम  डीएफसीच्या 306 किमी लांबीच्या रेवाडी – मदार सेक्शनचे उद्घाटन जानेवारी 2021 मध्ये झाले होते. तर पूर्व डीएफसीच्या 351 किमी लांबीच्या न्यू खुर्जा – न्यू भाऊपूर सेक्शनला डिसेंबर 2020 मध्ये सुरु केले होते. सध्या डीएफसी मार्गावर काही उपकरणे लावली असून ती ट्रेनच्या वेगाला मोजतात, वॅगनच्या एक्सल आणि व्हीलचे तापमान मोजतात.

कवच सिस्टम कसे काम करते

जर ट्रेनने लाल सिग्नल पार केला तर कवच सिस्टम ट्रेनला थांबवते. जर विरुध्द दिशेने त्याच ट्रॅकवर जर दुसरी ट्रेन आली तरी तिलाही कवच यंत्रणा रोखते. आतापर्यंत कमी ट्रेनमध्ये कवच यंत्रणा बसविण्यात आली आहे. रेल्वेच्या केवळ 5 ते 7 टक्के ट्रेनमध्येच ही यंत्रणा आहे. दक्षिण-मध्य रेल्वेवर 1,455 किमी मार्गावर कवच सिस्टीम लागू आहे. दिल्ली-मुंबई आणि दिल्ली-हावडा सेक्शनवर 2,951 किमी मार्गासाठी टेंडर झाले आहे.

शाह स्नेहभोजनासाठी तटकरेंच्या घरी, 'त्या' 45 मिनिटांत नेमकं काय घडलं?
शाह स्नेहभोजनासाठी तटकरेंच्या घरी, 'त्या' 45 मिनिटांत नेमकं काय घडलं?.
अष्टविनायकाच्या दर्शनाला जाताय? नीट कपड्यात जा..कारण आता ड्रेसकोड लागू
अष्टविनायकाच्या दर्शनाला जाताय? नीट कपड्यात जा..कारण आता ड्रेसकोड लागू.
गर्लफ्रेंडला टाकलं बॅगेत अन् आणलं बॉईज हॉस्टेलात, पुढे जे झालं त्यावर
गर्लफ्रेंडला टाकलं बॅगेत अन् आणलं बॉईज हॉस्टेलात, पुढे जे झालं त्यावर.
तटकरेंच्या घरी जेवणाचं आमंत्रण, गोगावले जाणार की नाही? स्पष्ट म्हणाले
तटकरेंच्या घरी जेवणाचं आमंत्रण, गोगावले जाणार की नाही? स्पष्ट म्हणाले.
तटकरेंच्या घरी स्नेहभोजन अन् पाहुणचार, शाहांसाठी काय स्पेशल मेन्यू?
तटकरेंच्या घरी स्नेहभोजन अन् पाहुणचार, शाहांसाठी काय स्पेशल मेन्यू?.
ऐनवेळी शिंदेंना भाषणाची संधी तर दादांचं भाषणच नाही, रायगडावर काय घडलं?
ऐनवेळी शिंदेंना भाषणाची संधी तर दादांचं भाषणच नाही, रायगडावर काय घडलं?.
शिंदेशाही पगडी, कवड्यांची माळ अन् जय भवानीचा गजर, शहांनी रायगड गाजवलं
शिंदेशाही पगडी, कवड्यांची माळ अन् जय भवानीचा गजर, शहांनी रायगड गाजवलं.
उदयनराजेंच्या मागणीवर CM म्हणाले, त्यांना टकमक टोकावरूनच लोटलं पाहिजे
उदयनराजेंच्या मागणीवर CM म्हणाले, त्यांना टकमक टोकावरूनच लोटलं पाहिजे.
शिंदेशाही पगडी, कवड्याची माळ अन्..अमित शाहांचा किल्ले रायगडावर सन्मान
शिंदेशाही पगडी, कवड्याची माळ अन्..अमित शाहांचा किल्ले रायगडावर सन्मान.
उदयनराजेंच्या रायगडावर अमित शहांसमोर 'या' 5 मागण्या, म्हणाले...
उदयनराजेंच्या रायगडावर अमित शहांसमोर 'या' 5 मागण्या, म्हणाले....