Railway News : रेल्वेची प्रवाशांसाठी खास सुविधा, आता तुमचे तिकीट कुटुंबियांच्या नावे ट्रान्सफर करा, कसे करायचे ते पाहा
रेल्वे प्रवासी आपली कन्फर्म तिकीट आता आपल्या रक्तातील नात्यांच्या नावे स्थानांतर करू शकणार आहेत. परंतू त्यासाठी त्यांना काही नियम पाळावे लागणार आहेत.
नवी दिल्ली : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जर तुम्ही रेल्वेने प्रवास करणार असला आणि परंतू तुम्हाला अचानक दुसरे काही महत्वाचे काम आले. तर चिंता करण्याची काहीही आवश्यकता नाही. कारण आता तुमच्या कन्फर्म तिकीटावर तुमच्या रक्ताच्या नात्यातील कौटुंबिक सदस्याला आता तुमच्या ऐवजी रेल्वेचा प्रवास करता येणार आहे. परंतू यासाठी तुमचे तिकीट मात्र कन्फर्म असायला हवे आहे. पश्चिम रेल्वेने यासंदर्भात ट्वीटरद्वारे माहीती दिली आहे.
कन्फर्म तिकीट ट्रान्सफर करण्याची सुविधा
ईद निमित्त शुक्रवारी 21 एप्रिल रोजी सिनेमाघरात बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान चित्रपट ‘किसी का भाई, किसी का जान’ हा चित्रपट रिलीज झाला आहे. या चित्रपटाच्या पोस्टरचा आणि नावाचा कल्पक वापर पश्चिम रेल्वेने मोठ्या अक्षरात ‘किसी का टिकट किसी का सफर’ नावाने ही योजना जाहीर केली आहे. रेल्वेने या संदर्भात स्पष्ट करताना म्हटले आहे की रेल्वे प्रवासी आपली कन्फर्म तिकीट आता आपल्या रक्तातील नात्यांच्या नावे स्थानांतर करू शकणार आहेत. परंतू त्यासाठी त्यांना काही नियम पाळावे लागणार आहेत.
काय आहेत नियम…
ज्यांच्याकडे कन्फर्म तिकीट आहे त्यांना जर प्रवास करायचा नसेल आणि त्यांच्या ऐवजी त्यांच्या कुटुंबियांना या तिकीटाचा वापर करायचा असेल तर त्याच्या 24 तास आधी नजिकच्या पीआरएस काऊंटरवर जाऊन चिफ रिझर्व्हेशन सुपर वायझरला रिक्वेस्ट करावी लागणार आहे. कुटुंबियांच्या सदस्यांचे नावे आरक्षित कन्फर्म तिकीट ट्रान्सफर करण्याची सुविधा काऊंटर तिकीट आणि ऑनलाईन तिकीट दोन्हीकरीता लागू आहे. ऑनलाईन काढलेले तिकीट कन्फर्म होताच प्रवासी आपल्या कुटुंबियाचे नावे ते ऑनलाईन स्ट्रान्सफर करू शकतील.
You can easily transfer ur confirmed ticket to family members by submitting a request till 24 hrs before departure of train to Chief Reservation Supervisor of nearest PRS Counter.
Carry valid ID of both passengers, proof of blood relation & copy of ticket.#KisiKaBhaiKisiKiJaan pic.twitter.com/LqB06p4lmu
— Western Railway (@WesternRly) April 21, 2023
हे सोपस्कार पार पाडा
तिकीट कन्फर्म झाल्यावर प्रवाशांना नजिकच्या पीआरएस काऊंटरवर जावे लागेल.
ट्रेन सुटण्याच्या 24 तास आधी पीआरएस काऊंटरला जावून रिक्वेस्ट करावी लागेल.
ज्या कुटुंबातील सदस्याला तुमच्या ऐवजी प्रवास करायचा असेल त्याची कागदपत्रे सादर करा.
ज्याच्या नावे तिकीट स्ट्रान्सफर करायचे त्याचे आणि स्वत:चे सरकारी ओळखपत्र, ब्लड रिलेशन दाखविणारे कागदपत्र, प्रवाशाच्या कन्फर्म तिकीटाचे पत्र दाखवावी लागेल.
ऑनलाईन तिकीटाबाबतही तिकीट कन्फर्म झाल्यावरच आपल्या रक्ताच्या नात्यातील सदस्यांच्या नावे तिकीट स्टान्सफर करता येईल