साल 2022-23 मध्ये रेल्वेने 2.7 कोटी प्रवाशांना प्रवास नाकारला, अन् सरकारचे सर्व लक्ष वंदेभारतकडेच, कॉंग्रेस नेत्याची टीका
वंदेभारत गाड्या सुरु होत आहेत ही आनंदाचीच बाब आहे. परंतू सर्वसामान्य प्रवाशांना रेल्वेची तिकीटे मिळत नसून लांबलचक प्रतिक्षा यादीतून रेल्वे प्रवाशांची केव्हा सुटका होणार ? असा सवालही कॉंग्रेस नेत्याने केला आहे.
नवी दिल्ली : एकीकडे सरकार वंदेभारत ( vande bharat express ) चालविण्याकडे प्राधान्य देत असताना दुसरीकडे साल 2022-23 या संपलेल्या आर्थिक वर्षांत 2.72 कोटी प्रवाशांना वेटींगची तिकीट हाती पडल्याने त्यांना प्रवासच करता न आल्याची माहीती माहीतीच्या अधिकारात मिळाल्याचे कॉंग्रेसचे ज्येष्ट नेते शशी थरूर ( shashi tharoor ) यांनी म्हटले आहे. मध्य प्रदेशच्या माहीती अधिकार कार्यकर्ते चंद्रशेखर गौर यांनी माहीतीच्या अधिकारात रेल्वे बोर्डाने ( railway board ) ही माहीती दिली असल्याचेही त्यांनी म्हटले आहे
साल 2022-23 या आर्थिक वर्षांत 2.72 कोटी प्रवाशांना वेटींगची तिकीटे मिळाल्याने त्यांची तिकीटे आपोआप रद्द होऊन त्यांना रिफंड मिळाल्याचे त्यांनी सांगितले. त्या आधीच्या आर्थिक वर्षांत साल 2021-22 हाच आकडा 1.65 कोटी होता, त्यावेळी एकूण 1.06 कोटी पीएनआर होते परंतू 1.65 कोटी प्रवाशांची तिकीटे कन्फर्म न झाल्याने त्यांची तिकीटे आपोआप रद्द होऊन त्यांना रिफंड मिळाल्याची माहीती असल्याचे कॉंग्रेस नेते शशी थरूर यांनी म्हटले आहे.
वंदेभारत गाड्या सुरु होत आहेत ही आनंदाचीच बाब आहे. परंतू सर्वसामान्य प्रवाशांना रेल्वेची तिकीटे मिळत नसून लांबलचक प्रतिक्षा यादीतून रेल्वे प्रवाशांची केव्हा सुटका होणार असा सवालही शशी थरूर यांनी केला आहे. 2.7 कोटी प्रवाशांना रेल्वे प्रवास नाकारत असल्याची बाब गंभीर असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरवर्षी रेल्वेची प्रतिक्षा यादी वाढतच चालली आहे. देशाच्या 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. परंतू वेटींग लिस्टच्या यादीतून रेल्वे प्रवाशांची सुटका कधी होणार ? अशा सवाल त्यांनी केला आहे.
कोरोनानंतर 10,678 ट्रेन सुरू
नॅशनल ट्रान्सपोर्ट भारतीय रेल्वे प्रवाशांना कन्फर्म तिकीट देऊ शकत नाही. मागणीच्या तुलनेत गाड्यांची अनुलब्धता ही भारतीय रेल्वेची मोठी समस्या आहे. कोरोना काळापूर्वी भारतीय रेल्वे 10,186 ट्रेन चालवित होती. आता 10,678 ट्रेन भारतीय रेल्वे चालवित आहे. सर्वत्र नेटवर्क सिग्नलिंग आणि ट्रॅ्कची कामे सुरू आहेत. ही कामे संपल्यावर आणखी ट्रेन चालविणे शक्य होईल असे रेल्वेचे म्हणणे आहे.