रेल्वेची माथेरानसह 8 हेरीटेज मार्गांवर 35 हायड्रोजन ट्रेन चालविण्याची योजना

| Updated on: Aug 11, 2023 | 7:37 PM

सध्याच्या डीझेल इलेक्ट्रीकल मल्टीपल युनिट्स ( DEMU ) च्या ऐवजी नवीन हायड्रोजन ट्रेन चालविण्याची भारतीय रेल्वेची महत्वाकांक्षी योजना आहे.

रेल्वेची माथेरानसह 8 हेरीटेज मार्गांवर 35 हायड्रोजन ट्रेन चालविण्याची योजना
matheran mini train
Image Credit source: socialmedia
Follow us on

नवी दिल्ली | 10 ऑगस्ट 2023 : भारतीय रेल्वेने आपल्या हायड्रोजन फॉर हेरिटेज योजनेवर काम करायला सुरुवात केली आहे. या योजनेत रेल्वे जागतिक वारसा असलेल्या पर्वतीय रेल्वे मार्गांवर हायड्रोजन इंधनावरील ट्रेन चालविणार आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी संवेदनशील अशा डोंगराळ भागात हायड्रोजन ट्रेन चालविण्याची योजना आहे. लोकसभेत रेल्वेसंबंधी स्थायी समितीच्या अहवालात ही माहीती दिली आहे. 80 कोटी रुपये प्रति ट्रेन, 70 कोटी रुपये प्रति रुट ग्राऊंड इन्फास्ट्रक्चरसाठी खर्च करुन 35 हायड्रोजन ट्रेन चालविण्याची योजना आहे.

सध्याच्या डीझेल इलेक्ट्रीकल मल्टीपल युनिट्स ( DEMU ) च्या ऐवजी नवीन हायड्रोजन ट्रेन चालविण्याची भारतीय रेल्वेची महत्वाकांक्षी योजना आहे. उत्तर रेल्वेच्या जिंद-सोनीपत विभागात ग्राऊंड इन्फास्ट्रक्चरसह हायड्रोजन इंधनावर धावणारे रेक तयार करण्याची योजना रेल्वेने आखली आहे. यासाठी 111.83 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. एकदा का ही योजना सुरु झाली की हरिज ऊर्जा क्षेत्रात रेल्वेची ही योजना एक मैलाचे दगड सिद्ध होणार आहे.

पहील्या प्रोटोटाईपची चाचणी जून 2024

स्थायी समितीने रेल्वेच्या या पावलाचे कौतूक केले असले तरी या लक्ष्याला गाठण्यासाठी योग्य तयारी आणि कठोरतेने काम करावे लागेल असे म्हटले आहे. भारतीय रेल्वे 1200 किलोवॅट हायड्रोजन इंधन सेल आधारीत वितरण पॉवर रोलिंग स्टॉकसाठी करार केला आहे. पहिल्या प्रोटोटाईप ट्रेनची चाचणी जून 2024 पासून सुरु होणार आहे.

या आठ मार्गांवर एकूण 35 ट्रेन धावणार

रोलिंग स्टॉक प्रोग्रॅम 2023-24 अनूसार आठ हेरिटेज मार्गांसाठी 35 ट्रेन – सेट रेकसाठी मंजूरू देण्यात आली आहे. यात प्रत्येक ट्रेनला सहा डबे असतील. ज्या हेरिटेज रेल्वे मार्गांवर हायड्रोजन ट्रेन धावतील त्याचे मार्ग खालील प्रमाणे आहेत.

– माथेरान हील रेल्वे

– दार्जिलिंग हिमालय रेल्वे

– कालका – सिमला रेल्वे

– कांगडा घाटी

– बिलमोरा वाघई

– पातालपानी कालाकुंड

– निलगिरी पर्वतीय रेल्वे

– मारवाड-गोरम घाट रेल्वे