मुंबईः दसऱ्याच्या दिवशी (Vijaya Dashami) हलक्याशा पावसाच्या सरी कोसळल्यानंतर आज राज्यभरात अनेक ठिकाणी पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे. अचानक बदललेल्या हवामानामुळे (Climate) आता सुरु झालेला पाऊस पुन्हा किती दिवस चालेल, असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित झालाय. मात्र काही दिवसांपूर्वी फिलिपाइन्समध्ये निर्माण झालेल्या नोरू चक्रीवादळाचा हा परिणाम असल्याची माहिती समोर आली आहे.
नोरू चक्रीवादळामुळे (Noru Cyclone) बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे हे चक्राकार वारे वाहत असून आर्द्रता वाढल्याने पावसाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये या वाऱ्यांचा परिणाम दिसून येतोय, अशी माहिती औरंगाबाद येथील हवामान तज्ज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी दिली आहे.
पुढील दोन दिवसात परतीच्या पावसाला सुरुवात होणार, अशी माहिती भारतीय हवामान विभागाचे शास्त्रज्ञ के. एस. होसळीकर यांनी दिली आहे. मात्र तत्पुर्वीच चक्रीवादळाचं सावट घोंगावत असल्याने हवामानात बदल झालाय.
6 Oct: A cyclonic circulation lies over south Coastal AP & nbhd.
Another cycir lies ovr central parts of south BoB.
All India severe weather warnings issued by IMD today for coming 5 days.
Watch for detailed district level warnings on IMD websites. pic.twitter.com/gaH1l8qEqP— K S Hosalikar (@Hosalikar_KS) October 6, 2022
स्कायमेटनुसार, आंध्र प्रदेश आणि लगतच्या भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय. त्यामुळे विविध ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल.
रबी पिकांना या पावसामुळे दिलासा मिळेल, अशी स्थिती आहे. तर भाजीपाला आणि फुलांवर थोडा विपरीत परिणाम होऊ शकतो.
हवामान खात्याने महाराष्ट्रासह 20 राज्यांना यलो अर्ट जारी केला आहे. यलो अलर्ट याचा अर्थ संबंधित राज्यांमध्ये मेघ गर्जनेसह जोरदार वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकतो.
या 20 राज्यांत उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, छ. गड, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, केरळ, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा आदींचा समावेश आहे.
6/10: North parts of Raigad district, Navi Mumbai, Ratnagiri, ghat areas of Pune Satara possibilities of mod thunderstorms during next 4,4 hrs as seen from the latest radar obs at 2pm. pic.twitter.com/9TF4dx5oP2
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) October 6, 2022
उत्तर प्रदेशमधील काही भागांना पुढील तीन दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. येथील काही भागात अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.