Rain Update : जुलैमध्ये धो-धो कोसळणार, हवामान खात्याचा इशारा काय

| Updated on: Jul 01, 2024 | 6:57 PM

देशात अनेक ठिकाणी पावसाने दडी मारली आहे. महाराष्ट्रात अजूनही चांगल्या पावसाची अपेक्षा आहे. धरण क्षेत्रात पाऊस झालेला नाही. त्यामुळे लोकांना चांगल्या पावसाची अपेक्षा आहे. आता हवामान खात्याने जुलैबाबत इशारा दिला आहे. काय आहे तो इशारा जाणून घ्या

Rain Update : जुलैमध्ये धो-धो कोसळणार, हवामान खात्याचा इशारा काय
Follow us on

राज्यात आणि देशात अनेक ठिकाणी अजूनही पावसाची प्रतिक्षा आहे. महाराष्ट्रात देखील अनेक ठिकाणी अजूनही मोजकाच पाऊस झाला आहे. त्यामुळे लोकांना चांगल्या पावसाची अपेक्षा आहे. धरण क्षेत्रात जर पाऊस झाला नाही तर पाण्याची समस्या उद्भवू शकते. एकीकडे पाऊस कमी असल्याने तापमान देखील कमी झालेले नाही. त्यातच भारतीय हवामान खात्याने (IMD) सोमवारी दिलासादायक बातमी दिली. ईशान्येतील काही भाग वगळता जुलैमध्ये सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो असा इशारा IMD चे प्रमुख मृत्युंजय महापात्रा यांनी दिला आहे. ते म्हणाले की, ‘देशभरात जुलैमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. सरासरी पर्जन्यमानाच्या 106 टक्के जास्त पाऊस पडेल. देशाच्या बहुतांश भागात सामान्य किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस अपेक्षित आहे. ईशान्य भारतातील अनेक भाग आणि उत्तर-पश्चिम, पूर्व आणि दक्षिण-पूर्व द्वीपकल्पातील काही भाग येथे अपवाद असू शकतात.

जुलै महिन्यातील सरासर तापमान कसे असेल

हवामान खात्याने म्हटले आहे की, पश्चिम किनारा वगळता, वायव्य भारत आणि दक्षिण द्वीपकल्पीय भारताच्या अनेक भागांमध्ये कमाल तापमान सामान्यपेक्षा कमी असेल. मध्य भारत, पूर्व आणि ईशान्य भारत आणि पश्चिम किनारपट्टीच्या अनेक भागांमध्ये कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त राहू शकते. अहवालानुसार, जुलै महिन्यात देशातील अनेक भागात किमान तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. उत्तर-पश्चिमचे काही भाग, मध्य भारताच्या लगतचे भाग आणि दक्षिण-पूर्व द्वीपकल्पातील काही भागात तो कमी असेल.

जुलैमध्ये चांगला पाऊस अपेक्षित

आयएमडीने सांगितले की, जुलैमध्ये मान्सूनचा चांगला पाऊस अपेक्षित आहे. साधारणपणे ढगाळ आकाशामुळे किमान तापमान जास्त असल्याचे दिसून येतेय.’ उत्तर-पश्चिम भारतात गेल्या महिन्यात जूनमध्ये सरासरी 31.73 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले, जे 1901 नंतरचे सर्वात उष्ण तापमान होते. मासिक सरासरी कमाल तापमान 38.02 अंश सेल्सिअस होते, जे सामान्यपेक्षा 1.96 अंश सेल्सिअस जास्त आहे. IMD च्या मते, सरासरी किमान तापमान 25.44 अंश सेल्सिअस होते, जे सामान्यपेक्षा 1.35 अंश सेल्सिअस जास्त आहे. उत्तर-पश्चिम भारतात जूनमध्ये सरासरी तापमान 31.73 अंश सेल्सिअस होते, जे सामान्यपेक्षा 1.65 अंश सेल्सिअस जास्त आहे. 1901 नंतरचे ते सर्वोच्च तापमान होते.