सर्वात मोठी बातमी! छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये नक्षलवाद्यांचा मोठा हल्ला, 11 जवान शहीद

| Updated on: Apr 26, 2023 | 4:16 PM

दंतेवाडा येथील अरणपूर येथे जिल्हा राखीव रक्षक दल (DRG) दलाच्या वाहनावर आयईडी हल्ला झाला. शहीद जवानांमध्ये 10 DRG सैनिक आणि एका ड्रायव्हरचा समावेश आहे.

सर्वात मोठी बातमी! छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये नक्षलवाद्यांचा मोठा हल्ला, 11 जवान शहीद
Follow us on

मुंबई : छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे नक्षलवाद्यांचा मोठा हल्ला झाला आहे. यामध्ये 11 जवान शहीद झाले आहेत. दंतेवाडा येथील अरणपूर येथे जिल्हा राखीव रक्षक दल (DRG) दलाच्या वाहनावर आयईडी हल्ला झाला. शहीद जवानांमध्ये 10 DRG सैनिक आणि एका ड्रायव्हरचा समावेश आहे. पोलीस आणि नक्षलवाल्यांमध्ये चकमक अजूनही सुरूच आहे. आणखी फोर्स मागवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

एकाही नक्षलवाद्याला सोडलं जाणार नाही. ही घटना अत्यंत दु:खद आहे. नक्षलवाद्यांविरुद्धची आमची लढाई अंतिम टप्प्यात आहे. नियोजनबद्ध पद्धतीने नक्षलवाद उखडला जाईल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी दिली आहे. या हल्ल्यानंतर पोलिसांनी नक्षलवाद्यांना घेरलं आहे.

 

दरम्यान, या हल्ल्याबाबत देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याकडून फोनवर माहिती घेतली आहे. त्यांनी मुख्यमंत्री बघेल यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिलं आहे. बस्तरचे आयजी सुंदरराज यांनी सांगितले की, जवान ऑपरेशनसाठी जात होते. दरम्यान, अरणपूरच्या पालनार भागात नक्षलवाद्यांनी आयईडीने जवानांनी वाहन उडवल्याचं, आयजी सुंदरराज यांनी सांगितलं. नक्षलवाद्यांच्या हल्ल्याची पद्धत अजिबात बदललेली नाही.