राजस्थानच्या भाजप आमदार किरण माहेश्वरी यांचा कोरोनामुळे मृत्यू, राजकीय क्षेत्रात हळहळ

राजस्थानच्या राजसमंद मतदारसंघातील भाजपच्या ज्येष्ठ आमदार किरण माहेश्वरी यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (Rajasthan BJP MLA Kiran Maheshwari passes away)

राजस्थानच्या भाजप आमदार किरण माहेश्वरी यांचा कोरोनामुळे मृत्यू, राजकीय क्षेत्रात हळहळ
Follow us
| Updated on: Nov 30, 2020 | 8:14 AM

जयपूर : राजस्थानच्या बेलगाव जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. राजस्थानच्या राजसमंद मतदारसंघातील भाजपच्या ज्येष्ठ आमदार किरण माहेश्वरी यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. हरियाणातील गुरुग्राम याठिकाणच्या मेदांता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. माहेश्वरी यांच्या अकाली निधनामुळे राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Rajasthan BJP MLA Kiran Maheshwari passes away)

किरण माहेश्वरी यांना भाजपाच्या कोटा उत्तर महानगरपालिकेच्या निवडणूक प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली होती. ऑक्टोबर महिन्यात कोटा महानगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान माहेश्वरी यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर मेदांता रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र काल (29 नोव्हेंबर) रात्रीच्या सुमारास त्यांची प्रकृती खालावली. यानंतर त्यांचा मृत्यू झाला.

माहेश्वरी यांच्या निधनानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह अनेक नेत्यांनी हळहळ व्यक्त केली आहे.

“राजस्थानच्या राजसमंद मतदारसंघातील आमदार बहिण किरण माहेश्वरी यांनी आपले संपूर्ण जीवन समाजसेवा आणि जनतेच्या हितासाठी वाहिले. त्यांचे अकाली जाणे हे माझ्यासाठी वैयक्तिक नुकसान आहे. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो.”

“माहेश्वरी यांनी राजकारणासह समाजकारणात विशेष ओळख निर्माण केली. सामाजिक विषयांसह महिला आणि वंचित घटकांसाठी त्या एक सशक्त आवाज होत्या,” असे ट्वीट ओम बिर्ला यांनी केले आहे.

(Rajasthan BJP MLA Kiran Maheshwari passes away)

संबंधित बातम्या : 

“रात्रीच्या गडद अंधारातच…” घटस्फोटाच्या अर्जानंतर आयएएस टॉपर टिना दाबीची सूचक पोस्ट

कोरोनाची लस आल्यानंतरही खबरदारी घ्या, सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर गरजेचाच- ICMR

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.