राजस्थानचे मुख्यमंत्री गहलोत यांच्या अडचणी वाढणार? सचिन पायलट होतील का मुख्यमंत्री?
अशोक गहलोत यांच्यावर सोनिया गांधी नाराज आहेत, असं म्हटलं जात आहे.अशोक गहलोत यांनी स्वत:हून हे तोट्याचं राजकारण खेळतायत असं म्हणतात.
नवी दिल्ली : काँग्रेसचे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांची यावेळी जादू चालणार नाही असं दिसतंय, कारण अशोक गहलोत(Ashok Gehlot) यांची पुढील महिन्यात काँग्रेस अध्यक्षपदी निवड होणार होती.या बदल्यात सचिन पायलट यांची राजस्थानच्या मु्ख्यमंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता होती. पण अशोक गहलोत यांची काँग्रेस अध्यक्षपदी आता निवड होईल, अशी शक्यता फारच कमी झाली आहे. कारण अशोक गहलोत यांच्यावर सोनिया गांधी नाराज आहेत, असं म्हटलं जात आहे.अशोक गहलोत यांनी स्वत:हून हे तोट्याचं राजकारण खेळतायत असं म्हणतात.
कारण काँग्रेस हायकमांडना ही अपेक्षा होती की, जयपूरमध्ये सर्व काँग्रेस आमदार एका ओळीत असा ठराव पास करतील की, राजस्थानचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल, याचा निर्णय काँग्रेस हायकमांड घेतील, पण असं झालं नाही.
काँग्रेसच्या जवळ-जवळ ९० ते ९१ आमदारांनी बंड पुकारलं आणि अध्यक्ष सीपी जोशी यांच्याकडे राजीनाम्याचा प्रस्ताव ठेवला. कारण होतं, सचिन पायलट यांना मुख्यमंत्रीपदासाठी नकार, विरोध.
यामुळे काँग्रेस हायकमांडचा पारा चढला असल्याचं सांगण्यात येत आहे. यामुळे आता अशोक गहलोत यांच्याकडे मुख्यमंत्रीपद टिकवणे आणि काँग्रेस अध्यक्षपद मिळवणे या दोन्ही गोष्टी कठीण होवू शकतात.
ज्या आमदारांनी बंड पुकारण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावर कारवाई होवू शकते, आणि काही ना काही करुन सचिन पायलट यांना मुख्यमंत्रीपदी बसवलं जाईल अशी देखील एक शक्यता आहे.
मात्र तुलनेने अशोक गहलोत हे जर शक्तीशाली ठरत असतील तर काँग्रेसची अडचण होणार आहे.पण यातही अशोक गहलोत यांना काँग्रेसअध्यक्षपदाच्या निवडणुकीत पसंती न देणे आणि त्यांची ताकद कमी करणे हा उद्देश नक्कीच काँग्रेसचा असेल.
यात विरोधी पक्षाला पुढील विधानसभा निवडणुकीत फायदा होवू शकतो, पण काँग्रेस ही अडचण किंवा हा प्रश्न कोणत्या पद्धतीने हाताळणार आहे, हे नक्कीच पाहण्यासारखं आणि ऐतिहासिक ठरणार आहे.
सचिन पायलट यांना मुख्यमंत्रीपदी बसवण्यासाठी काँग्रेसच्या काही दिग्गज नेत्यांनी मध्यस्थी केली आहे. सचिन पायलट हे एक तरुण नेतृत्व समजलं जातं आणि काँग्रेसला एक उभारी घेण्याचा काळ पुढे दिसत असल्याने अशा तरुण नेतृत्वाची गरज असल्याने, सचिन पायलट यांना मुख्यमंत्रीपदी बसवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.