गहलोतांच्या माफीने निष्ठा आणखी गडद झाली…

अशोक गहलोत यांनी रविवारी जयपूरमध्ये जे राजकीय नाट्य घडले आहे, त्याची त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारली आहे.

गहलोतांच्या माफीने निष्ठा आणखी गडद झाली...
Follow us
| Updated on: Sep 29, 2022 | 5:50 PM

नवी दिल्लीः राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत (Rajsthan CM Ashok Gehlot) यांनी दिल्लीतील 10 जनपथवर आपण काँग्रेस अध्यक्ष पदाच्या निवडणुकीतून बाहेर जात असल्याचे जाहीर करताच काँग्रेसमधील त्यांचे निष्ठावान नेत्यांमध्ये शांतता पसरली. गेहलोत यांनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक (Congress President Election 2022) लढवणार नसल्याचे जाहीर करत सोनिया गांधींची त्यांनी लेखी माफीही मागितली. त्यामुळे एका अर्थाने राजस्थानातील काँग्रेसमध्ये निर्माण झालेले राजकीय संकट तात्पुरते का होईना संपुष्टात आले.

मात्र, राजस्थानची धुरा कोणाच्या हाती राहणार याबाबत मात्र अजूनही साशंकता दिसून येत आहे. काँग्रेस अध्यक्ष पदाची निवडणुकीतून बाहेर पडल्यावर गहलोतांना मुख्यमंत्रीपदाचा निर्णय आता हायकमांडवर सोडला आहे.

त्यामुळे सीएम पदावर तुम्हीच कायम राहणार का या प्रश्नावर मात्र त्यांनी याचा निर्णय सोनिया गांधीचे घेतील असंही स्पष्ट केले.

तर दुसरीकडे राजस्थानमधील राजकीय घडामोडींवर गहलोत यांनी रविवारी सोनियांची भेट घेऊन त्यांनी राजस्थानातील राजकीय घडामोडींचा सगळा इतिहास त्यांनी लेखी स्वरुपात हायकमांडला दिला आहे.

हा लेखी अहवाल देताना त्यांनी आपली नैतिक जबाबदारी स्वीकारत राजस्थानातील राजकीय नाट्यामध्ये आपण अपयशी ठरलो असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर गेहलोत सांगितले की, गेल्या 50 वर्षांपासून मी काँग्रेसचा निष्ठावान सैनिक आहे. रविवारी घडलेल्या घटनेमुळे सर्वानाच धक्का बसला आहे.

त्यामुळे मीही दुःखी आहे.आणि ते फक्त मीच जाणू शकतो. त्या घटनेमुळे मला मुख्यमंत्रीपदी राहायचे आहे हाच संदेश साऱ्या देशात गेल्यानेही मी दुःखी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

अशोक गहलोत यांनी रविवारी जयपूरमध्ये जे राजकीय नाट्य घडले आहे, त्याची त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारली आहे.

यावेळी त्यांनी संस्कृती सांगत एका ओळीचा ठराव मंजूर करण्याची आपली परंपरा आहे, परंतु दुर्दैवाने हा ठराव होऊ शकला नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या घटनेमुळे मला नेहमीच दु:ख होत राहील असंही त्यांनी सांगितले.

गहलोत यांच्या विधीमंडळ पक्षाची बैठक रद्द झाल्याची नैतिक जबाबदारी त्यांनी घेतल्यानंतर आता भविष्यात ते विधिमंडळ पक्षाच्या बैठकीची जबाबदारी पार पाडणार की नाही याकडे राजस्थानातील आमदारांचे लक्ष लागून राहिले आहे.

तर दुसरीकडे गहलोत यांनी मागितलेली माफी भावनिकरित्या त्यांच्या पत्त्यावर पडणार काय याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

तर दुसरीकडे सचिन पायलट यांच्याविरुद्ध खेळलेली खेळी ही त्यांच्याच अंगलट आली आहे. त्यामुळे त्यांनी मागितलेली माफी ही राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.

राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाबाबत कोणतेही स्पष्ट उत्तर न देता गहलोत यांनी हा निर्णय हायकमांडवर सोपवला आहे. आता गहलोत यांच्या माफीनंतर सोनिया गांधी त्यांना अध्यक्षपदाव्यतिरिक्त मुख्यमंत्री पदावरून हटवण्याचा निर्णय घेतात का,याकडे नेत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

तर गहलोत यांनी यापुढे आपण दिल्लीला जाणार नसल्याचे सांगितल्यामुळे सचिन पायलट यांचा राजस्थानातील मार्ग आता खडतर असणार असंही बोललं जात आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.