मुख्यमंत्री म्हणाले लग्न पुढे ढकला, युवक म्हणाला गर्लफ्रेंडच लग्न थांबवा, नेमकं प्रकरण काय?
मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राज्यात 17 मे पर्यंत लॉकडाऊन लागू केलं आहे. Ashok Gehlot Ankur Dourwal
जयपूर: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे (Corona virus) संपूर्ण देशात हाहा:कार उडालेला आहे. रोज लाखो रुग्ण आढळत असल्यामुळे आरोग्य व्यवस्था ढासळली आहे. या पार्श्वभूमीवर देशातील विविध राज्यांनी त्यांच्या पातळीवर रुग्णसंख्येचा विचार करता लॉकडाऊन (lockdown) लागू केलेला आहे. राजस्थानमध्ये सध्या 2 लाख सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण आहेत. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राज्यात 17 मे पर्यंत लॉकडाऊन लागू केलं आहे. कोरोना संकटाच्या काळात लग्न समारंभ लांबणीवर टाका, अशी फेसबुक पोस्ट त्यांन केली. त्यावर एका व्यक्तीनं लग्न समारंभांवर बंदी घालावी, अशी मागणी केली. कारण, त्या व्यक्तीच्या गर्लफ्रेंडचं लग्न दुसऱ्या व्यक्तीबरोबर होणार होते, ते थांबाव, अशी त्याची इच्छा होती. (Rajasthan CM Ashok Gehlot Facebook post on postpone marriages during Corona and Lockdown comment of Ankur Dourwal viral on social media)
नेमक काय घडलं?
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले, कोरोनाच्या भयानक अशा दुसऱ्या लाटेमध्ये ज्या लोकांची लग्न आहेत त्यांनी ती लांबणीवर टाकावीत. सध्या लग्नांमध्ये आनंदासह कोविडची भीती अधिक राहील. त्यामुळे कोरोना महामारीवर विजय मिळवण्यासाठी संक्रमणाची साखळी तोडणं आवश्यक आहे. लग्नांमध्ये येणाऱ्या गर्दीमुळं ते शक्य नाही, असं अशोक गेहलोत म्हणाले.
अंकुर डौरवाल काय म्हणाला?
अशोक गेहलोत यांच्या फेसबुक पोस्टवर अंकुर गौरवाल यानं कॉमेंट केली. यामध्ये त्यानं अशोक गेहलोत यांच्याकडे लग्नांवर बंदी घालण्याची मागणी केली. “उद्या माझ्या गर्लफ्रेंडचं लग्न आहे, तेही थांबेल. तुम्ही एक काम करा आज रात्रीपासूनचं गाईडलाईन्स जारी करा, म्हणजे 5 मे पासून होणारी लग्न थांबतील”. अशी विनंती अंकुर गौरवाल यानं अशोक गेहलोत यांच्याकडे केली. या युवकाची प्रतिक्रिया सर्वत्र व्हायरल होतं आहे.
अशोक गेहलोत यांची फेसबुक पोस्ट
राजस्थानात 17 मे पर्यंत लॉकडाऊन
मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी कोरोना विषाणू संसर्गाची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी 17 मे पर्यंत लॉकडाऊन लागू केला आहे. राजस्थानात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 2 लाखांच्या जवळपास आहे. तर, शनिवारी राजस्थानात 18 हजार 231 कोरोना रुग्ण वाढले आहेत. राजस्थानातील कोरोनाबाधितांची संख्या 7 लाखांवर पोहोचली आहे. तर, पाच हजार जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे.
आयटी कंपनी Cognizant भारतातील 28 हजार जणांना नोकरी देणार, फ्रेशर्सना मोठी संधीhttps://t.co/LZwAKLi7vS#ITJobs | #Jobs | #Privatejobs | #cognizant
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 9, 2021
संबंधित बातम्या
मुंबईतील पोलीस ठाण्यांच्या इमारतींची कामांना गती द्या, पालकमंत्री आदित्य ठाकरेंचे आदेश
अरे देवा! कंगना वडिलांबाबत हे काय बोलली?; चाहते म्हणाले, थू तुझ्यावर!
(Rajasthan CM Ashok Gehlot Facebook post on postpone marriages during Corona and Lockdown comment of Ankur Dourwal viral on social media)