Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गेहलोत म्हणाले, काँग्रेसचं अध्यक्षपद मिळालं तर ‘या’ पदावरही दावा करणार

काँग्रेस अध्यक्ष पदासाठी राहुल गांधींनी नकार देताच अशोक गेहलोतांनी मात्र अध्यक्ष पदासाठी सगळीच तयारी केली आहे.

गेहलोत म्हणाले, काँग्रेसचं अध्यक्षपद मिळालं तर 'या' पदावरही दावा करणार
Follow us
| Updated on: Sep 21, 2022 | 4:29 PM

नवी दिल्लीः काँग्रेस अध्यक्ष (Congress President) पदासाठी निवडणूक होण्याची चिन्हं आता स्पष्ट होऊ लागली आहेत. अशोक गेहलोतांनी (Ashok Gehlot) अध्यक्ष पदाबाबत बोलताना सांगितले की, हायकमांडनी जर नाव सुचवलं गेलं तरच दोन पदांचा मुद्यांची गोष्ट समोर येते. आणि ही निवडणूक (Election 2022) आहे, आणि खुल्या पद्धतीने ही निवडणूक होत आहे. त्यामुळे ही निवडणूक आमदार, खासदार, मंत्री कुणीही ही निवडणूक लढवू शकते. मात्र कोमत्याही राज्याचा मंत्री जर निवडणूक लढवू पाहत असेल तर तो निवडणूक लढवू शकतो आणि तो मंत्रिपदावरही राहू शकतो असं स्पष्ट मतही त्यांनी व्यक्त केले आहे.

काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या 17 ऑक्टोबर रोजी निवडणुको होत आहेत. त्याचवेळी राहुल गांधींनीही अध्यक्षपदासाठी निवडणूक लढण्यास नकार दिला आहे.

त्यामुळे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी स्पष्ट केले आहे की जर राहुल गांधी ही निवडणूक लढविणार नसतील तर या पदासाठी तेच उमेदवारी राहतील.

त्यामुळे या राजकीय परिस्थितीत जेव्हा त्यांना ‘एका व्यक्ती, एक पद’ या सूत्रानुसार त्यांना विचारण्यात आले तेव्हा त्यांनी गेहलोतांनी सांगितले की, ही एक मुक्त आणि खुली निवडणूक आहे. त्यामुळे या लढाईत कोणीही लढू शकते.

राहुल गांधी यांनी स्पष्टच नकार दिला असल्याने अशोक गेहलोतांनी आतापासून मोर्चेबांधणी सुरु केली आहे. त्या पदावर विराजमान होण्यासाठी त्यांनी मुक्त आणि खुल्या निवडणुकीचे समर्थन देत ही काँग्रेस अध्यक्ष पदाची निवडणूक कोणीही लढवू शकतो असंही त्यांनी स्पष्ट केले आहे. मग ते मंत्री असली तरीही या निवडणुकीत ते उभा राहू शकतात.

मुख्यमंत्री असण्याच्या प्रश्नावरही बोलताना ते म्हणाले की, पक्षात मी कोणत्याही पदाचा विचार करत नाही. मात्र पक्षाला माझ्यामुळे जर फायदा होत असेल तर मला त्या पदावर जावचं लागेल.

त्यामुळे या शर्यतीतून मी मागे हटणार नाही. काँग्रेसची देशात आज परिस्थिती वाईट आहे. त्यामुळे काँग्रेसला मजबूत करण्यासाठी मला हा निर्णय घ्यावाच लागेल असंही त्यांनी सांगितले.

काँग्रेस पक्षाला बळकट करण्यासाठी मी आता मागे हटणार नाही. आणि काँग्रेसला देशात मजबूत करायचे असेल तर राहुल गांधींनी हे पद स्वीकारले पाहिजे.

काँग्रस अध्यक्ष म्हणून जर त्यांनी देशभर दौरा केला तर पक्षाची एक वेगळी प्रतिमा तयार होईल असंही ते म्हणाले, आणि तेच मी करणार आहे.

काँग्रेस अध्यक्ष पद आणि राहुल गांधी यांच्याविषयी देशातून समर्थन असल्याने काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांनी सांगितले की, अनेक राज्यांतून राहुल गांधींनी काँग्रेस अध्यक्ष बनावे म्हणून पाठिंबा मिळत आहे.

मात्र ते निवडणुका लढवतील की नाही, हा त्यांचा निर्णय आहे. मात्र 17 ऑक्टोबर रोजी पक्षाला मात्र नवीन अध्यक्ष मिळणार असल्याचा विश्वासही सचिन पायलट यांनी व्यक्त केला.

नव्या नेतृत्वामुळे काँग्रेसला एक नवी उभारी मिळणार असून काँग्रेस आणखी मजबूत होईल असंही त्यांनी यावेळी सांगितले.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.