राजस्थानात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती, दौसामध्ये 341 चिमुकले कोरोनाच्या विळख्यात

राजस्थानातील दौसा जिल्ह्यात तब्बल 341 लहान मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. (Rajasthan Corona Dausa Children)

राजस्थानात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती, दौसामध्ये 341 चिमुकले कोरोनाच्या विळख्यात
Corona Third Wave
Follow us
| Updated on: May 23, 2021 | 8:22 AM

जयपूर : कोरोनाची दुसरी लाट थांबत नाही, तोच तिसऱ्या लाटेने दरवाजावर ठोठावलं आहे. राजस्थानमधील दौसा येथे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत मिळत आहेत. दौसामध्ये 341 चिमुकले कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. तिसऱ्या लाटेच्या शक्यतामुळे दौसा जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आहे. (Rajasthan Corona Third Wave Dausa District 341 Children found COVID Positive)

341 मुलं कोरोना पॉझिटिव्ह

राजस्थानातील दौसा जिल्ह्यात तब्बल 341 लहान मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. ही मुलं 0 ते 18 वर्ष वयोगटातील आहेत. दौसा जिल्ह्यात 1 मे ते 21 मे या काळात 341 मुलं कोरोना पॉझिटिव्ह आढळली. सुदैवाने यापैकी कोणाचीही प्रकृती गंभीर नसल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. मात्र कोव्हिडच्या तिसऱ्या लाटेची चिन्हं पाहता दौसा जिल्हा प्रशासन दक्ष आहे.

राजस्थानमधील ग्रामीण भागात फैलाव

दरम्यान राजस्थानमधील ग्रामीण भागात कोरोना रोखण्यासाठी राजस्थान सरकारने आता युद्धपातळीवर तयारी सुरू केली आहे. आरोग्य विभागाची टीम गावोगावी आणि घरोघरी फिरुन लोकांची कोविड टेस्ट करत आहे. गावातच कोव्हिड सेंटर बांधले जातील आणि कोरोनाग्रस्त रूग्णांवर उपचार सुरू केले जातील. डोअर-टू-डोअर सर्वेक्षण अभियान सुरू झाले आहे.

तिसरी लाट मुलांसाठी धोकादायक?

विशेष म्हणजे तिसरी लाट येण्यापूर्वीच मुलांमध्ये कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. महाराष्ट्र, कर्नाटकसारख्या राज्यांतील मुलांमध्ये कोरोना संसर्ग झपाट्याने पसरत आहे. तज्ज्ञांचा अंदाज आहे की तिसरी लाट मुलांसाठी धोकादायक असू शकते. तिसऱ्या लाटेत लहान मुलं मोठ्या संख्येने कोरोना पॉझिटिव्ह होण्याचा अंदाज वर्तवला आहे. अशा परिस्थितीत, आता दौसामध्ये 341 मुले कोरोनाग्रस्त आढळल्याने अडचणीत भर पडली आहे.

15 दिवसांच्या काळात 19 हजार मुलांना संसर्ग

एका आकडेवारीनुसार, 9 मार्च ते 25 सप्टेंबर 2020 दरम्यान कोरोनाच्या पहिल्या लाटेत 10 वर्षांखालील लहान मुलांच्या 19 हजार 378 केसेस सापडल्या होत्या. तर 11 ते 20 वर्ष वयोगटातील 41 हजार 985 प्रकरणं आढळली होती. त्याच वेळी, कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत हे आकडे वाढले. फक्त 15 दिवसांच्या काळात म्हणजे 1 ते 16 मे 2021 पर्यंत 19 हजार लहान मुलं कोरोनामुळे बाधित झाली आहेत.

लहान मुलांमधील लक्षणं कोणती?

आरोग्य तज्ज्ञांच्या माहितीनुसार बहुतेक मुलांना सामान्यत: सौम्य ताप, खोकला, सर्दी, श्वास घेण्यात अडचण, अतिसार, अन्नाची चव नसणे, गंध घेण्याची क्षमता कमी होणे, थकवा, घसा खवखवणे, स्नायूदुखी, नाक वाहणे अशा लक्षणांचा समावेश आहे.

संबंधित बातम्या :

म्युकरमायकोसिस संसर्गजन्य नाही, तो जमिनीतून आपल्या शरिरात जातो – डॉ. तात्याराव लहाने

कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्यात लहान मुलांवर वाईट परिणाम होणार नाही, निती आयोगाचा दिलासादायक दावा

(Rajasthan Corona Third Wave Dausa District 341 Children found COVID Positive)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.