प्रभू रामाचे वंशज आजही आहेत, या राज्यातील राजकारणात सक्रीय
अयोध्येत पाचशे वर्षांच्या प्रदीर्घ काळाच्या प्रतिक्षेनंतर भगवान रामलल्लाची भव्य राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. या सोहळ्याला जगभरातून मान्यवर उपस्थित राहीले आहेत. या भव्य कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला आहे. भगवान रामाचे वंशज कोण असा प्रश्न तुमच्या मनात येत असेल तर त्याबद्दलची माहीती खालील प्रमाणे आहे.
नवी दिल्ली | 22 जानेवारी 2024 : आज संपूर्ण देशाचे नजर अयोध्येत लागली आहे. पाचशे वर्षांनंतर रामलल्लाची अयोध्येत विधीवत प्राणप्रतिष्ठा झाली आहे. या सोहळ्याला देशातील अनेक नामी गिरामी हस्ती उपस्थित राहील्या आहे. रामाचा उल्लेख होतात मनात एक प्रश्न निर्माण होतो की भगवान रामाचे वंशज आज कुठे आहेत. काही मान्यतेनूसार अयोध्येपासून सुमारे 700 किमी दूर असलेल्या राजस्थानातील जयपूरात रामाचे वंशज आजही राहतात. राजस्थानच्या उपमुख्यमंत्री दीया कुमारी स्वत: रामाच्या कुटुंबाचे वंशज असल्याचे मानतात.
दीया कुमारी यांचा दावा काय ?
राजस्थानच्या उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेत्या दीया कुमारी यांनी जयपूर घराणे रघुकुल रामाच्या कुटुंबाचा हिस्सा असल्याचे म्हटले आहे. भगवान रामाचे दोन पूत्र होते. लव आणि कुश होते. दीया कुमारी यांच्या दाव्यानूसार जयपूर राजघराणे कुशचे वंशज आहेत. दीया यांच्या दाव्यानूसार त्यांचे वडील श्री रामाची 309 वी पिढी होती. आणि त्या 310 वी पिढी आहेत. संपूर्ण जगात रामाच्या वंशावलीची अनेक कुटुंबे आहेत.
दीया कुमारी यांनी पुरावे दिले
दीया कुमारी यांच्या म्हणण्याप्रमाणे आपण लहानपणापासून त्यांचे कुटुंब रामाच्या पिढीचे वंशज असल्याचे ऐकत आलो आहोत. दीया यांनी म्हटले की गुगलवर कछवाहाची वंशावली आहे. त्यानूसार देखील त्यांचे कुटुंब श्री रामाचे वंशज आहे. याशिवाय जयपूर राजघराण्याच्या पोथ्यांमध्ये आणि संग्रहालयात याचे दस्तावेज आणि पुरावे आहेत. राठोड राजपूत हे भगवान रामाचा मुलगा लवचे वंशज आहेत.
दीया कुमारी कोण आहेत…?
दीया कुमारी यांचे नाव राजस्थानाच्या राजकारणात वेगाने पुढे आले आहे. साल 2018 नंतर सवाई माधोपूरमधून त्या आमदार बनल्या आहेत. त्यानंतर 2019 नंतर त्या राज्यसभेतील खासदार बनल्या. भाजपाने त्यांना राजस्थानचे उपमुख्यमंत्री पद दिले. राज्यात मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्यानंतर नंबर दोनचे पद त्यांना दिले आहे.