निष्ठावान राहिलोच नसतो तर राज्यात काँग्रेस तर राहिली असती का..? गेहलोत गटाचा सवाल…

'आम्ही आमची निष्ठा सिद्ध केली आहे. त्यामुळे ज्यांना निष्ठेविषयी प्रश्न पडला आहे, त्यांनी आधी आपली निष्ठा सिद्ध करावी असं वक्तव्यं राजस्थानात होत आहेत.

निष्ठावान राहिलोच नसतो तर राज्यात काँग्रेस तर राहिली असती का..? गेहलोत गटाचा सवाल...
Follow us
| Updated on: Sep 27, 2022 | 5:32 PM

नवी दिल्लीः राजस्थानात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असल्याने तेथील राजकारणाला प्रचंड वेग आला आहे. राज्यातील या सगळ्या गदारोळात सरकारचे मुख्य सचेतक डॉ. महेश जोशी (Mahesh Joshi) यांनी आम्ही पक्षाचे निष्ठावान लोक आहोत आणि आम्ही निष्ठावान राहिलो नसतो तर राज्यातील काँग्रेसचे सरकार कधीच पडले असते. असा पलटवार त्यांनी काँग्रेसवरच केला आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Rajstahn CM Ashok Gehlot) यांच्या निष्ठावंत आमदारांनी घेतलेली वेगळी बैठक ‘अनुशासनहीन’ असल्याचे सांगत असताना आणि काँग्रेसचे प्रदेश प्रभारी अजय माकन (Ajay Makan) यांच्या विधानाचा समचार घेताना हे विधान केले गेले आहे.

सरकारचे मुख्य सचेतक डॉ. महेश जोशी यांनी सांगितले की, जे सवाल उपस्थित करत आहेत, त्यांनीच आधी आपली निष्ठा सिद्ध करावी असंही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी त्यांनी सांगितले की, आमच्या गटावर कोणीही निष्ठेचा सवाल उपस्थित करु नये. आणि केली तर ती आम्ही सिद्धही करु असंही त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले.

यावेळी त्यांनी हेही सांगितले की, आम्ही हायकमांडवरील आमची निष्ठा अजिबात गमावली नाही. आमची निष्ठा नसती तर राजस्थानमधील काँग्रेसचे सरकार कधी पडले असते असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

सचिन पायलट यांच्यावर पलटवार करताना जोशी यांनी सांगितले की, ‘आम्ही आमची निष्ठा सिद्ध केली आहे. त्यामुळे ज्यांना निष्ठेविषयी प्रश्न पडला आहे, त्यांनी आधी आपली निष्ठा सिद्ध करावी.

काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी येथे आलेले काँग्रेस सरचिटणीस आणि प्रदेश प्रभारी माकन यांनी सोमवारी सांगितले होते की गेहलोत यांचे निष्ठावंत आमदारा अधिकृत बैठकीला उपस्थित राहिले नाहीत, त्यामुळे हे अनुशासनात्मक आहे, यावरही त्यांनी जोरदार टीका केली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची रविवारी रात्री बैठक होणार होती, मात्र गेहलोत यांच्या गटाचे निष्ठावंत आमदार त्या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत.

त्याच आमदारांनी संसदीय कामकाज मंत्री शांती धारिवाल यांच्या बंगल्यावर बैठक घेतली. त्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष डॉ. सी.पी. जोशी यांची भेट घेऊन त्यांच्याकडे राजीनामाही सुपूर्द केला.

त्यामुळे राजीनामा नाट्यानंतर या आमदारांच्यावतीने धारिवाल, जोशी आणि प्रताप सिंह यांनी माकन आणि मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली.

माकन यांनी सांगितले की, या लोकांनी विधीमंडळ पक्षात प्रस्ताव आणण्यासाठी तीन अटी ठेवल्या होत्या. मात्र त्यावर महेश जोशी यांनी सांगितले की, या तीन गोष्टी आमच्या प्रस्तावाचा भाग आहेत असं आम्ही कधीच म्हटले नाही.

या तीन गोष्टी तुम्ही हायकमांडपर्यंत पोहोचवा, असे आम्ही सांगितले होते आणि त्यानंतर हायकमांडच्या निर्णयानुसार आम्ही एका ओळीचा ठराव करू असंही आम्ही त्यांना सांगितले होते मात्र हा पुढे काँग्रेसच्याच नेत्यांनी गोंधळ घातला असल्याचेही त्यांनी सांगितले.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.