लग्न न जमणाऱ्यांची यादी द्या, सगळ्यांची लग्नं लावून टाकतो, या खासदारानं दिलं गावकऱ्यांना आश्वासन
मुलांच्या आपल्या भावी जोडीदारांबद्दलच्या अपेक्षा हल्ली इतक्या वाढल्या आहेत की मुला आणि मुलींची लग्न होणं कठीण बनलं आहे.
करौली : लग्न होण्यासाठी 36 गुण जुळून यावे लागतात. वयात आलेल्या तरुण आणि तरुणींचे लग्न न जमणे ही हल्ली मोठी समस्या बनत चालली आहे. त्यामुळे लग्नाळु मुले आणि मुलांची लग्न न होण्याची समस्या खूपच वाढली आहे. प्रत्येक तरुण आणि तरुणीला सरकारी नोकरी असलेले स्थळ हवे असते. त्यामुळे लग्न ( Marriage ) न जमणे ही समस्या राष्ट्रीय समस्या बनली आहे. यातच एका लोकप्रतिनिधींनी जर गावकऱ्यांना आश्वासन दिलं की तुमच्या येथील मुलांची लग्नं जुळत नाहीत त्यांची यादी द्या पाहू, आपल्या मतदार संघात त्यांची लग्नं लावू देतो तर ! अशी अजब घटना घडली आहे.
मुलांच्या आपल्या भावी जोडीदारांबद्दलच्या अपेक्षा हल्ली इतक्या वाढल्या आहेत की मुला आणि मुलींची लग्न होणं कठीण बनलं आहे. महाराष्ट्रासह आणि इतर राज्यातील काही गावात स्री भृण हत्येमुळे असमान लिंग गुणोत्तरामुळे मुलांना लग्नासाठी मुलीच मिळत नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे मुला आणि मुलांमध्ये शिक्षणाचे वाढलेले प्रमाण, करीयरला दिलेले प्राधान्य त्यामुळे लग्न न होणं ही एक मोठी समस्या झाली आहे.
भाजपाचे राजस्थानचे जुने जाणते राज्यसभा खासदार किरोडी लाल मीणा यांचा करौलीच्या मामचारी गावात दौरा होता. यावेळी जमलेल्या गावकऱ्याच्या समस्या सोडविण्याच्या भरात त्यांनी आगळेच आश्वासन दिले. मीणा यांनी गावकऱ्यांना म्हटले की येथे जेवढे लग्नावाचून ज्यांचं अडलं आहे अशा सगळ्यांची एक यादी मला द्या, त्यासर्वाची लग्न मी माझे क्षेत्र महवा येथून लग्न लावून देतो. आहात कुठे !
घोटाळ्याच्या अर्ध्या पैशात चंबळचे पाणी…
ते पुढे म्हणाले की जेवढ्या खाणी चालू आहेत त्यात अशोक गेहलोत सरकारने सर्वाधिक भष्ट्राचार केला आहे. आतापर्यंत 66,000 कोटीचा घोटाळा झाला आहे. मुख्यमंत्री म्हणत आहेत की मोदीजी ईआरसीपी लागू करण्यास मदत करीत नाहीएत. ईआरसीपीचा प्रोजेक्ट केवळ 37,000 कोटींचा आहे. परंतू जेवढ्या कोटींचा घोटाळा त्याच्या अर्ध्या पैशात चंबळचे पाणी मामचारीत आले असते असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी त्याचे विरोधक राजस्थानचे ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्री रमेश मीणा यांचे नाव न घेता त्यांच्यावर शाब्दीक हल्ला केला. हे काही राजकीय व्यासपीठ नाही परंतू यासर्व घराणेशाहीने राजस्थानाला लुटले आहे.