महिन्याची कमाई 8 हजार, आयकर विभागाची नोटीस 12 कोटीची !

पेशाने फोटोग्राफर असणाऱ्या तरुणाला आयकर विभागाची रिकव्हरीची नोटीस आली. नोटीसवरील आकडा पाहून तरुणाच्या पायाखालची जमीनच सरकली.

महिन्याची कमाई 8 हजार, आयकर विभागाची नोटीस 12 कोटीची !
आयकर विभाग नोटीसImage Credit source: social
Follow us
| Updated on: Apr 04, 2023 | 12:46 PM

भीलवाडा : राजस्थानमधील भीलवाडा येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. महिना 8 ते 10 हजार रुपये कमावणाऱ्या एका तरुणाला आयकर विभागाकडून 12 कोटी 23 लाख रुपयांची रिकव्हरी नोटीस आल्याने एकच खळबळ उडाली. नोटीस पाहून तरुणाला धक्काच बसला. आधी त्याने नोटीशीवरील नाव नक्की आपलेच आहे हे कन्फर्म केले. मग थेट तरुणाने सुभाष नगर पोलीस ठाणे गाठले आणि फिर्याद दाखल केली. कृष्ण गोपाल छापरवाल असे सदर तरुणाचे नाव आहे. कृष्ण छापरवाल हा दिव्यांग असून, त्याचे फोटोग्राफीचे छोटेसे दुकान आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

तरुणाच्या आधारकार्ड आणि पॅनकार्डचा दुरुपयोग केल्याचे उघड

कृष्ण छापरवाल याच्या पॅनकार्ड आणि आधारकार्डचा दुरुपयोग करुन कृष्णच्या नावे सूरतमध्ये दोन कंपन्या सुरु करण्यात आल्या. मात्र या कंपन्यांशी आपला दुरान्वये संबंध नसून, आपण कधी सूरतला गेलोच नसल्याचे कृष्णने स्पष्ट केले. तसेच आपल्या कागदपत्रांचा गैरवापर करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणीही कृ्ष्ण याने केली आहे.

तरुणाची महिन्याची कमाई 8 ते 10 हजार रुपये

तरुणाचे भीलवाडा येथे छोटेसे दुकान आहे. तरुण फोटोग्राफर असून, लग्नसमारंभात फोटोग्राफी करुन महिन्याला जेमतेम 8 ते 10 हजार रुपये कमावतो. कृष्णला वित्तीय वर्ष 2019-20 मध्ये पॅनकार्डच्या माध्यमातून शेठ जेम्स प्रा. लि. ला 56 लाख 16 हजार 709 रुपये आणि दुष्यंत वैष्णवच्या नावे 11 कोटी 70 लाख 73 हजार 377 रुपये इनकम टॅक्स भरण्याची नोटीस जारी केली आहे.

हे सुद्धा वाचा

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.