एका म्यानात दोन तलवारी? तरीही तलवार चालणारच…
राजस्थानातील आमदारांनी अजय माकन यांच्यावर सचिन पायलटांच्या मुख्यंमंत्री पदासाठी लॉबिंग केल्याचा आरोप केला गेला आहे.
नवी दिल्लीः सध्या देशातील सगळ्यात मोठ्या राजकीय घडामोडी राजस्थानात (Rajsthan) घडत आहेत. त्यामुळे राजस्थानकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे. आता राजस्थानमधील राजकीय पेचप्रसंगाचा अहवालही काँग्रेस निरीक्षकांनी सोनिया गांधींना (Sonia Gandhi) दिला आहे. मात्र या अहवालात ज्यांच्यामुळे राजस्थानेच राजकारण ढवळून निघाले, त्या अशोक गेहलोताना (CM Ashok Gehlot) या राजकीय पेचप्रसंगाला जबाबदार न धरता त्यांना क्लीन चिट दिल्याचे समोर आले आहे. यासोबतच निरीक्षकांव्यतिरिक्त दुसरी बैठक बोलावणाऱ्या राजस्थानातील तीन प्रमुख नेत्यांवर शिस्तभंगाची कारवाईह करण्याची शिफारस केली गेली आहे.
राजस्थानमध्ये काँग्रेसचे आमदार सचिन पायलट यांना मुख्यमंत्री बनवण्यास विरोध करत होते. त्यामुळे काँग्रेसमधील हा वाद मिठवण्यासाठी काँग्रेस हायकमांडने मल्लिकार्जुन खर्गे आणि अजय माकन यांना निरीक्षक म्हणून पाठवण्याचा निर्णय घेतला.
खर्गे आणि माकन तिथे जाऊन त्यांचे मत काही आमदारांनी ऐकून घेतले नाही. मात्र त्याच आमदारांनी अजय माकन यांच्यावर सचिन पायलट यांच्या मुख्यंमंत्री पदासाठी लॉबिंग केल्याचा आरोप केला गेला आहे.
गेहलोत गटाच्या आमदारांनी तर कॅबिनेट मंत्री शांती धारिवाल यांच्या घरीही बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीला संसदीय कामकाज मंत्री शांती धारीवाल यांच्यासह मुख्य सचेतक डॉ.महेश जोशीही उपस्थित होते. मात्र या बैठकीला आम्हाला फसवून बोलवल्याची टीकाही आमदारांनी केली आहे.
ज्या बैठकीला निरीक्षकांनी आक्षेप घेतला होता, त्याच बैठकीतील नेत्यांवर आता कारवाईची शिफारस करण्यात आली आहे.
सोमवारी संध्याकाळी दिल्लीत आल्यानंतर मल्लिकार्जुन खर्गे आणि अजय माकन यांनी सोनिया गांधी यांची भेट घेऊन ते लेखी अहवाल देणार आहेत.
या बैठकीत गेहलोत गटाच्या आमदारांनी तीन अटी ठेवल्या होत्या. त्यातील पहिली अट होती, 19 ऑक्टोबरनंतर राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांबाबत निर्णय घ्यावा. म्हणजे काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निकालानंतरच तो निर्णय घेतला जावा.
दुसरी अट म्हणजे काँग्रेस आमदारांशी गटातटाने संवाद साधवा. तर तिसरी अट होती की सीएम गेहलोत हे राजस्थानमधील काँग्रेस गटाचेही प्रमुख असावेत.
त्यामुळे या आमदारांचा सचिन पायलट यांना थेट विरोधच दिसून आला. गेहलोत गटाचे बहुतांश आमदार हे पायलट यांच्या विरोधातच आहेत.
राजस्थानमधील राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मंगळवारीच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबरोबरही चर्चा करण्यात आली आहे. त्याचवेळी गेहलोत यांनी मी काँग्रेस हायकमांडला कधीही आव्हान देणार नसल्याचेही स्पष्ट केले होते.