हायकमांडनी फक्त अहवाल मागितला; …तर यांनी ‘त्यांची’ सगळी कुंडलीच मांडली…
अशोक गेहलोतांना ज्या पदासाठी राजस्थानातील काँग्रेसचा खेळ चालवला होता, तोच खेळ आता त्यांच्या अंगलट आला आहे.
नवी दिल्लीः राजस्थानातील राजकीय पेचप्रसंग आता काँग्रेसच्या हायकमांड (Congress High Command) यांच्या कोर्टात गेला आहे. ज्या अशोक गेहलोतांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याचा विचार केला होता, त्याच गेहलोतांच्या आता सगळं अंगलट आले आहे. त्याचमुळे हा राजकीय पेचप्रसंगाबाबत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या 10 जनपथ येथील निवासस्थानी झालेल्या बैठकीत अनेक मुद्यांवर चर्चा झाली आहे. यावेळी पक्षाचे निरीक्षक मल्लिकार्जुन खर्गे आणि अजय माकन यांनी सोनिया गांधींना (Sonia Gandhi) राजस्थानमधील सगळ्याच घडामोडींची माहिती दिली.
त्यानंतर अजय माकन यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, राजस्थानातील सर्व घडामोडींची माहिती सोनिया गांधींना सांगितली आहे.
त्यामुळे त्यांनी या प्रकरणाचा लेखी अहवाल मागवला असून आज रात्री किंवा उद्या सकाळी हा लेखी अहवाल देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी माकन यांनी बोलताना सांगितले की, काँग्रेस विधिमंडळ पक्षाची काल संध्याकाळी बैठक झाली. त्याच्या संमतीने ही बैठक पार पडली होती.
त्यावेळी प्रत्येक आमदाराकडे एकावेळी एक गोष्ट असायला हवी अशा सूचना काँग्रेस अध्यक्षांकडूनही देण्यात आल्या होत्या.
आणि त्यापुढील निर्णय हायकमांडने घ्यायचा होता पण आमदारांनी आमच्यासमोर तीन अटी ठेवल्या होत्या. त्या बैठकीत सांगण्यात आले की, जो काय निर्णय घ्यायचा तो 19 तारखेनंतर घ्यावा अशा अटी घालण्यात आल्या होत्या.
या बैठकीविषयी माहिती सांगताना माकन म्हणाले की, राजकीय हितसंबंध जपण्यासाठीच दोन वर्षांपूर्वी गेहलोत यांच्यासोबत जी व्यक्ती होती.
त्यांनाच त्यांना मुख्यमंत्री बनवायचे होते. विधीमंडळ पक्षाची कोणतीही बैठक बोलावण्यात आल्यानंतर त्याचवेळी इतर कोणतीही समांतर बैठक होत असेल तर मात्र ती शिस्तभंग असते असंही त्यांनी सांगितले.
राजस्थानमधील नवीन मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा करण्यासाठी रविवारी रात्री काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक मुख्यमंत्र्यांच्याच निवासस्थानी बोलवण्यात आली होती.मात्र गेहलोत यांच्याशी निष्ठा असलेले अनेक आमदार या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत.
त्यांनी संसदीय कामकाज मंत्री शांती धारिवाल यांच्या बंगल्यावर बैठक घेतली आणि तेथून ते विधानसभेचे अध्यक्ष डॉ. सी.पी. जोशी यांना भेटायला गेले होते. त्यानंतर या आमदारांनी राजीनामाही दिला होता अशीही माहिती दिली.
याआधी अजय माकन म्हणाले होते की, जे आमदार (बैठकीला) आले नाहीत, त्यांना आम्ही सांगत राहिलो की, सर्वांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत.
तुम्ही जे बोलाल ते सांगू असे त्यांनी आमदारांना सांगितले. दिल्लीला जाऊन सांगू. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी वेगवेगळ्या समोरासमोर बोलण्याची सूचना केली आहे.
काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य राजस्थानात गेल्यानंतर संसदीय कामकाज मंत्री शांती धारिवाल, चीफ व्हीप महेश जोशी आणि मंत्री प्रतापसिंह खाचरियावास त्यांचे प्रतिनिधी म्हणून आमच्याकडे आले.
त्यावेळी त्यांनी आमच्यासमोर तीन अटी घातल्या होत्या. ते प्रथम म्हणाले की, काँग्रेस अध्यक्षांना निर्णय घेण्याचे अधिकार देण्याचा ठराव संमत करावयाचा असेल तर तो जरूर करावा, पण हा निर्णय त्यांनी 19 ऑक्टोबरनंतरच घ्यावा असं त्यांनी सांगितले.
माकन यांनी सांगितले की, आम्ही गेहलोत समर्थक आमदारांना सांगितले की, तुम्ही असं काही करु नका. परंतु त्यांनी आम्हाला सांगितले की, तुम्हाला हे जाहीरपणे सांगायचे आहे, आणि ठरावाचा भाग बनवायचा आहे.
आज जरी ठराव मंजूर झाला तरी तो होईल मात्र तो ऑक्टोबर नंतर केले जाईल असंही त्यांनी सांगितले. आम्ही म्हणालो की आम्ही आमदारांबरोबर एक एक करून बोलू, तरीही त्यांनी गटातच बोलण्याची आग्रह धरला.
आमदारांना कोणत्याही दबावाशिवाय बोलता यावे यासाठी काँग्रेसची ही नेहमीच प्रथा राहिली आहे की, आम्ही एक एक बोलतो, तरीही त्यांनी गटामार्फतच बोलण्याची आग्रह धरला असल्याचेही त्यांनी सांगितले.