20 सेकंदामध्ये संपूर्ण बंदूक खाली केली, करणी सेनेच्या अध्यक्षाला गोळ्या घालतानाचे CCTV फुटेज समोर
Sukhdev Singh Gogamedi Murder CCTV Footage Video : भर दिवस करणी सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्षाला गोळ्या घालून ठार करण्यात आल्याने सर्वत्र चर्चा होत आहे. आरोपींनी यामध्ये एका व्यक्तीला हाताशी धरत एकदम पद्धतशीरपणे गेम केला. घरामध्ये नेमकं काय घडलं? जाणून घ्या.
जयपूर : राजस्थानमध्ये राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांच्य हत्येने संपूर्ण देश हादरून गेला आहे. दोन हल्लेखारांनी अवघ्या 20 सेकंदामध्ये त्यांना गोळ्या मारत संपलवलं, आरोपींनी बंदुकीचे 12 राऊंड फायर केले. सुखदेव सिंह यांच्या हत्येचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. अंगावर काटा आणणाऱ्या व्हिडीओमध्ये आरोपींनी धडाधड गोळ्या मारत त्यांना संपवून टाकलं.
नेमकं काय घडलं?
सुखेदव यांना ज्या हल्लेखोरांनी मारलं ते येताना स्कॉर्पिओ गाडीमधू आले होते. आल्यावर त्यांनी गाडी बाहेर पार्क केली त्यानंतर त्यांच्यासोबत तिसरा व्यक्ती होता. आरोपींनी सुखदेव सिंह यांना भेटण्यासाठी त्याचा वापर केला होता. तिघेही आतमध्ये बसले यामधील एक व्यक्ती सुखदेव यांच्याशी बोलताना दिसत आहे. सुखदेव यांच्यासोबत हल्लेखोरही बोलले याचा अर्थ ते सुखदेव यांना ओळखत होते.
दहा मिनिटे बोलण झाल्यानंतर ज्या व्यक्तीच्या आसऱ्याने ते आले होते. तो व्यक्ती सुखदेव यांना फोनमध्ये काहीतरी दाखवू लागला. सुखदेव पाहत असताना त्यावेळी आरोपींनी आपल्या जवळील पिस्तुल काढली आणि सुखदेव यांच्यावर फायरिंग करायला सुरूवात केली. यावेळी ज्या व्यक्तीला तो सोबत घेऊन आले होते त्यालाही आरोपींनी हल्ला करत संपवून टाकलं.
राजपूत करणी सेना के राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेड़ी
कुख्यात गैंगस्टर लॉरेंस बिश्नोई के गुर्गे ने ली करणी सेना के अध्यक्ष की हत्या की जिम्मेदारी#Rajasthan #KarniSena #MurderCase #Jaipur #lawrencebishnoi pic.twitter.com/B6yB73x4HK
— Kamit Solanki (@KamitSolanki) December 5, 2023
हल्ला होताचा सुखदेव यांचा बंदूकधारी अंगरक्षक आतमध्ये आला. त्यावेळी आरोपींनी त्यालाही गोळी मारली. ती गोळी त्याच्या पायाला लागली असून त्यानंतर जखमी अवस्थेत रूग्णालयात दाखल करण्यात आलं. आता त्याच्यावर उपचार चालू असून श्याम नगरमधील पोलीस घटनास्थळी तपास करत आहेत.
ही घटना घडलेल्या श्याम नगर येथील दाना-पानी रेस्टॉरंटच्या मागे सुखदेव सिंह गोगामेडी यांचे घर आहे. यापूर्वीही सुखदेव सिंह गोगामेडी यांना लॉरेन्स विश्नोई टोळीकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. लॉरेन्स विश्नोई टोळीच्या संपत नेहराने ही धमकी दिली होती. धमकी मिळाल्यानंतर सुखदेव यांनी जयपूर पोलिसांना निवेदन देऊन सुरक्षा वाढवण्याची मागणी केली होती.
आरोपींनी सुखदेव यांना गोळी मारल्यावर तिथून पळ काढताना स्कॉर्पिओचा वापर केला. यावेळी स्कॉर्पिओमध्ये आणखी कोणी होतं का याचा पोलीस तपास करत आहेत. ही घटना श्यामनगरमधील दाणी-पाणी रेस्टारँटच्या मागे सुखदेव सिंह मोडी यांचं घरात घडली. सुखदेव सिंह यांना याआधी लॉरेन्स विश्नोई गंँगच्या संपत नेहरा याने जीवे मारण्याची धमकी दिली होती.