Video : मन भरून शिक्षक नाचत होता… अन् काहीवेळात होत्याचं नव्हतं झालं, व्हिडीओ एकदा पाहाच
कोणासोबत कधी काय घडेल काही सांगता येत नाही. आज आपल्याशी मस्त गप्पा मारून गेलेला व्यक्तीच्य मृत्यूची बातमी कानावर पडते. त्यावेळी आपल्याला विश्वास ठेवणं अवघड होतं. मात्र सत्य आपण टाळू शकत नाही. अशाच प्रकारची एक घटना शिक्षकासोबत घडली आहे.
सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल झालेला दिसत आहे. हा व्हिडीओ जयपूरमधील एका शिक्षकाचा असून नाचता नाचता अचानक तो खाली कोसळला. महिलेसोबत नाचताना ते आनंदात असलेले दिसत होते. मात्र अचानक ते खाली पडले आणि त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. आजूबाजूला बसलेल्या लोकांना वाटलं ते नाचत आहेत. पण ते पडल्यानंतर उठलेच नाहीत. त्यांना नेमकं काय झालं जाणून घ्या.
ही घटना जयपूरमधील भैंसनाला येथे घडली. शुक्रवारी रात्री मोठ्या भावाच्या सेवानिवृत्त जलबली बालाजी मंदिरात भजन कार्यक्रम ठेवला होता. या कार्यक्रमामध्ये शिक्षक मन्नाराम जाखड हे त्यांच्या गावी या कार्यक्रमासाठी आले होते. त्यांचे थोरले भाऊ मंगल जाखड मुंडोटी येथील शासकीय उच्च माध्यमिक विद्यालयातून शिक्षक म्हणून निवृत्त झाले होते.भजनावेळी ते भरपूर नाचताना दिसले.
रात्री 12 वाजता ‘एक दिन मार जाने ला कानुडा, धरी मुस्कान के मारे…’ या भजनावर नाचू लागले. पण नाचता नाचता अचानक ते खाली पडले. सुरूवातीला कोणलाच काही समजलं नाही, कारण ते आधी नाचत होते. खाली पडल्यावर सर्वजण आधी गोंधळले पण जेव्हा त्यांची काहीच हालचाल नाही झाली. तेव्हा सगळे घाबरले आणि त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. पण डॉक्टरांनी तपासत काही वेळात त्यांना मृत घोषित केलं.
पाहा व्हिडीओ:-
जयपूरमध्ये भजनावर नाचत असताना एका शिक्षकाचा मृत्यू #viral #Jaipur #teacher pic.twitter.com/1vXq7jSLyj
— Harish Malusare (@harish_malusare) August 4, 2024
मन्नाराम जाखड यांच्या अशा अचानक मृत्यूने त्यांच्या घरावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेवर कोणाचाही विश्वास बसत नव्हती त्यांचा अशा प्रकारे मृत्यू झाला आहे. संपूर्ण घरावर शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झालेला दिसत आहे.