एक विवाह ऐसा भी! दोन्ही बहिणींनी एका तरूणासोबतच केलं लग्न, कारण वाचून तुम्हीच म्हणताल…

लव्ह मॅरेज, कोर्ट मॅरेज म्हटलं की चर्चा होतेच. पण आता एका अनोख्या लग्नाची चर्चा सुरू आहे. या लग्नाबाबत ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल.

एक विवाह ऐसा भी! दोन्ही बहिणींनी एका तरूणासोबतच केलं लग्न, कारण वाचून तुम्हीच म्हणताल...
लग्नमंडपात वीजेचा शॉक लागून महिलेचा मृत्यू
Follow us
| Updated on: May 17, 2023 | 8:59 PM

नवी दिल्ली : प्रत्येक वधू-वरासाठी लग्न हे सात जन्माचं पवित्र बंधन मानलं जातं. सध्या एखाद्याचं लग्न म्हटलं की तो चर्चेचा विषय ठरतोच. आतापर्यंत आपण वेगवेगळ्या धर्मानुसार वेगवेगळ्या लग्नाच्या पद्धती पाहिल्या आहेत. त्याचबरोबर लव्ह मॅरेज, कोर्ट मॅरेज म्हटलं की चर्चा होतेच. पण आता एका अनोख्या लग्नाची चर्चा सुरू आहे. या लग्नाबाबत ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल.

राजस्थानमधील टोक जिल्ह्यात चक्क दोन मुलींनी एका मुलाशी लग्न केलं आहे. विशेष म्हणजे या दोन मुली एकमेकींच्या सख्ख्या बहिणी आहेत. सख्ख्या बहिणींनी एका मुलाशी लग्न केल्याने सर्व लोक चकित झाले आहेत. काही महिन्यांपूर्वीच तुम्ही अशाच एका लग्नाबद्दल ऐकलं असेल. सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथे दोन जुळ्या बहिणींनी एका मुलाशी लग्न केलं होतं. त्यांचंही लग्न त्यावेळी चांगलंच चर्चेत आलं होतं. तसंच आता राजस्थानमध्येही असाच प्रकार झाल्याने सगळीकडे चर्चा आहे.

या अनोख्या लग्नाचा प्रकार मोरझाला येथील झोपडिया गावात घडलेला आहे. या गावातील हरिओम नावाच्या एका मुलाच्या घरचे त्याच्यासाठी मुलगी शोधत होते. त्यावेळी सीदडा गावात राहणारे बाबुलाल मीणा यांची मुलगी कांताचं स्थळ हरिओमसाठी आलं होतं. त्यानंतर हरिओम आणि त्याच्या घरचे कांताला पाहण्यासाठी गेले होते. त्यावेळी लग्न ठरण्याअगोदर कांताने हरिओम आणि कुटुंबियांसमोर एक अट मांडली. कांताची छोटी बहिण सुमन ही मानसिकरीत्या कमजोर असेन कांताचा तिच्यावर खूप जीव आहे. त्यामुळे कांतानं अट मांडली की ती त्याच मुलाशी लग्न करेन जो मुलगा तिच्याशी आणि तिच्या बहिणीशी लग्न करेल.

मिळालेल्या माहितीनुसार, हरिओमनं सांगितलं की, जेव्हा कांतानं ही अट घातली तेव्हा त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना धक्का बसला होता. पण कांताचा तिच्या बहिणीवर खूप जीव होता तसंच कांताला तिची आयुष्यभर सेवा करायची होती. बहिणींचं हे प्रेम पाहून हरिओमच्या घरचे लग्नासाठी तयार झाले. तसंच 5 मे रोजी हरिओमचं या दोन बहिणींशी अगदी धुमधडाक्यात लग्न झालं. या अनोख्या लग्नसोहळ्यात मुलगा आणि मुलीकडचे सर्व नातेवाईक उपस्थित होते.

नवरी कांताने याबाबत सांगितलं  की, तिला तिच्या बहिणीची खूप काळजी घ्यायची आहे. तसंच तिनं तिच्या बहिणीला स्वतःसोबत अगदी सावलीप्रमाणे ठेवलं आहे. त्यामुळे तिनं ही लग्नाची अट ठेवली होती. जेणेकरून तिच्या बहिणीचं दुसर्‍या कोणाशी लग्न होऊन तिकडे तिचे हाल किंवा तिला कसलाही त्रास होऊ नये म्हणून. सध्या या अनोख्या लग्नाची चर्चा होत असून अनेक लोक कौतुक करताना दिसत आहेत.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.