राजूची राजकारणातही गूगली, सपातून भाजपात, निवडणूक न लढता मंत्री, हा अँगल वाचला का?
राजू श्रीवास्तव यांच्या पाचवीलाच संघर्ष पूजला होता, म्हणून ते म्हणत माझ्या वाट्याला आलं ते लोकांच्या वाट्याला येऊ नये म्हणून मी राजकारणात प्रवेश केला आहे.
नवी दिल्लीः कॉमेडीतील बादशहा म्हणून ओळखले जाणाऱ्या राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांचे आज निधन झाले आणि मनोरंजन क्षेत्रावर शोककळा पसरली. काही दिवसांपूर्वी व्यायाम करतानाच त्यांची अचानक तब्बेत बिघडली आणि त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात (AIIMS Hospital) दाखल केले गेले. राजू श्रीवास्तव म्हणजे फक्त विनोदवीर आणि मनोरंजन क्षेत्रातच होते असं नाही तर त्यांनी यशस्वी राजकीय प्रवासही केला आहे. 2012 मध्ये त्यांनी समाजवादी पक्षातून त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली होती.
उत्तर प्रदेशमधील कानपूरमधून त्यांनी 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीसाठी त्यांना तिकीट देण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला, आणि तिकीट परत केले,
आपल्या विनोदाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या राजू श्रीवास्तव यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केल्यावर त्यांना एक वेगळा धडा शिकायला मिळाला असं त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. समाजवादी पार्टीकडून मिळाले तिकीट तुम्ही परत का केले या प्रश्नावर बोलतान ते म्हणाले की, मला तिकीट मिळाल्यानंतर कानपूरमध्ये मला प्रशासनाचा ढिसाळ कारभार बघता आला.
तिथे प्रत्येक व्यक्ती स्वतःला नेता समजते. मुलायम सिंग यादव पक्षासाठी जे करायला सांगतात, त्यापेक्षा वेगळं आणि दुसरंच तिथं केलं जातं. त्यावेळी मला समाजवादी पार्टीतूनच मला निवडणूक लढवावी असं वाटत होतं मात्र तशी मी पक्षाकडे मागणीही केली होती.
त्यावेळी अनेक गोष्टी मी अखिलेश आणि मुलायम सिंग यांना सांगितल्या होत्या. मात्र त्यावेळी कोणतीही कारवाई झाली नाही. ते आपल्या राजकीय दौऱ्यात व्यस्त राहिले आणि माझ्याकडे दुर्लक्षही केले गेले. त्यामुळे पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन मी पक्षही सोडला.
कॉमेडीच्या क्षेत्रात संघर्ष करुन मिळवलेल्या यशानंतरही राजकारणात का यावं वाटलं असा सवाल त्यांना करण्याता आला होता. त्यावेळी ते म्हणाले की, माझ्या आयुष्यात मी खूप संघर्ष केला आहे, अडीअडचणींचा सामना केला आहे.
हुंडा दिला नाही म्हणून बहिणीचं लग्न मोडलेलं मी बघितलं आहे. लाच दिली नाही म्हणून भावाची गेलेली नोकरी हे प्रसंग मी जवळून बघितले होते. त्यामुळे राजकारणात येऊन जनसामान्यांना मदत करायची म्हणून मी राजकारणात आलो असल्याचे त्यांनी सांगितले होते. आणि मदत ही एकच गोष्ट मला राजकारणात घेऊन आली आहे असंही ते सांगत होते.
समाजवादी पक्षातून बाहेर पडून तुम्ही भाजपला का जवळ केला, त्यावर ते म्हणाले की, फक्त नरेंद्र मोदींसाठी. भाजपमध्ये तुम्हाला काय दिसलं यावरही ते म्हणत मी फक्त नरेंद्र मोदी यांच्यामुळेच भाजपमध्ये आहे. देशातील मोठे निर्णय घेण्याची ताकद फक्त नरेंद्र मोदी यांच्यामध्येच असल्याचेही त्यांनी सांगितले होते.
राजू श्रीवास्तव यांच्या भाषणातून अरविंद केजरीवाल आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली जात होती. अरविंद केजरीवाल यांच्या मफलरला घेऊन त्यांनी अनेक विनोद केले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजू श्रीवास्तव यांची स्वच्छ भारत अभियानच्या ब्रँड अँबेसिडरपदी त्यांची नेमणूक केली होती. त्या अभियानाच एक भाग म्हणून देशातील अनेक शहरातून जाऊन त्यांनी हे अभियान यशस्वीपणे राबविण्याचा प्रयत्न केला होता.राजू श्रीवास्तव यांच्या या कामामुळेच त्यांना भाजपने स्टार प्रचारकही केले होते.
उत्तर प्रदेशामध्ये योगी आदित्यनाथ यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांना उत्तर प्रदेश फिल्म डेव्हलपमेंट कौन्सिलचे अध्यक्षपदावरही त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळेच त्यांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जाही मिळाला. त्यामुळे ते बर्याच दिवसांपासून चर्चेत राहिले होते. उत्तर प्रदेशातील चित्रपटांच्या निर्मितीस चालना देण्यासाठीही ते या प्रकल्पाचा एक भाग झाले होते.