Rajya Sabha Election : जे भाजपानं महाराष्ट्रात केलं, ते काँग्रेसनं राजस्थानमध्ये, तिसरा उमेदवार जिंकण्यासाठी घोडेबाजार होणार?
2020 मध्ये आमचे सरकार सीपीएम, बीटीपी, बसपा आणि अपक्ष आमदारांनी वाचवले होते. तर काँग्रेसचे सर्व आमदार हे एकजूट आहेत. त्याचवेळी, काँग्रेसमध्ये बाहेरच्या उमेदवारांवर नाराजी असताना, गेहलोत म्हणाले की, पक्षाच्या हायकमांडने सल्लामसलत केल्यानंतर निर्णय घेतला आहे ज्यामध्ये आमचे सर्व कार्यकर्ते एकत्र आहेत.
राजस्थान : राजस्थानमधील 4 जागांसाठी होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून (Congress Party) रणदीप सुरजेवाला, प्रमोद तिवारी आणि मुकुल वासनिक यांनी मंगळवारी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी तिन्ही नेते जयपूरच्या मोती डुंगरी गणेश मंदिरात दर्शन घेण्यासाठी पोहोचले. यानंतर ते मुख्यमंत्री अशोक गेहलोत (ashok gehlot)यांच्यासह प्रदेश काँग्रेस मुख्यालयात पोहोचले आणि तिन्ही नेत्यांना टीळा लावण्यात आला. यावेळी प्रदेश काँग्रेस मुख्यालयात काँग्रेसच्या तिन्ही उमेदवारांच्या नामांकनावेळी सचिन पायलट, अशोक गेहलोत यांच्यासह प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गोविंद सिंग दोतसरा उपस्थित होते. त्याचवेळी अर्ज केल्यानंतर या तिन्ही उमेदवारांनी राज्यसभेत विजयाची निशाणी दाखवली. त्याचवेळी भाजपच्या वतीने घनश्याम तिवारी यांनी विधानसभेत उमेदवारी दाखल केला. याशिवाय उद्योगपती सुभाष चंद्रा यांनीही राज्यसभा निवडणुकीत (rajya sabha election) भाजपच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला. विशेष बाब म्हणजे आज राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.
Rajasthan | All three nominees of Congress for Rajya Sabha elections – Randeep Singh Surjewala, Mukul Wasnik, and Pramod Tiwari – file their nominations in the presence of CM Ashok Gehlot and party leader Sachin Pilot. pic.twitter.com/1N5gkFfUa6
हे सुद्धा वाचा— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) May 31, 2022
भाजपकडे कमी आमदार असतानाही अपक्ष उमेदवार उभे केल्याने ही लढत रंजक बनली असून, त्यानंतर निवडणुकीत क्रॉस व्होटिंगही होऊ शकते, असे मानले जात आहे. त्याचवेळी भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी आमदारांची गोळाबेरिज करण्यास सुरूवात केली आहे.
आम्ही तिन्ही जागा जिंकू
दुसरीकडे, सुभाष चंद्रा यांनी अपक्ष म्हणून रिंगणात उतरवल्याबद्दल गेहलोत म्हणाले की, अशा प्रकारे उमेदवार उभे करण्याची भाजपची जुनी पद्धत आहे. या लोकांना निवडणुकीचे वातावरण बिघडवायचे आहे. आमदारांची संख्या नसतानाही, घोडेबाजार करण्याचा इरादा यांचा लपून राहीलेला नाही. भाजपने दुसरा उमेदवार उभा केला आहे. 2020 च्या राजकीय संकटाच्या काळात राज्यसभा निवडणुकीत आमचे सरकार वाचवणाऱ्या सर्व आमदारांचा आम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल, असेही गेहलोत यांनी सांगितले.
गेहलोत म्हणाले की, 2020 मध्ये आमचे सरकार सीपीएम, बीटीपी, बसपा आणि अपक्ष आमदारांनी वाचवले होते. तर काँग्रेसचे सर्व आमदार हे एकजूट आहेत. त्याचवेळी, काँग्रेसमध्ये बाहेरच्या उमेदवारांवर नाराजी असताना, गेहलोत म्हणाले की, पक्षाच्या हायकमांडने सल्लामसलत केल्यानंतर निर्णय घेतला आहे ज्यामध्ये आमचे सर्व कार्यकर्ते एकत्र आहेत.
माझे राजस्थानशी जुने नाते
दुसरीकडे, उमेदवारी दाखल केल्यानंतर सुभाष चंद्रा यांनी विधानसभेबाहेर सांगितले की, मी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला मी विनंती केली होती की, मला माझ्या मूळ राज्यातून राज्यसभेवर पाठवावे. आणि तसे झाले. त्यासाठी मी हायकमांडचा आभारी आहे. चंद्रा यावेळी म्हणाले की, मी भाजप वगळता सर्व आमदारांना पाठिंबा देण्याचे आवाहन करतो. ते म्हणाले की, राज्यसभा सदस्य या नात्याने राजस्थानचे प्रश्न सभागृहात मांडण्याचा मी सर्वतोपरी प्रयत्न करेन.
दुसरीकडे, आकड्यांबाबत चंद्रा म्हणाले की, मी अनेक अपक्ष आमदारांशी बोललो आहे, त्यानंतरच मी निवडणुकीत उतरलो आहे. संपूर्ण 41 आमदारांची मते आपल्याला मिळतील, असा दावाही चंद्रा यांनी केला. याशिवाय सतीश पुनिया म्हणाले की, भाजपने आज घनश्याम तिवारी यांचा अर्ज दाखल केला आहे. दुसरीकडे, आम्ही दुसरे उमेदवार म्हणून सुभाष चंद्रा यांना उभे केले आहे, ज्यासाठी आमचे उर्वरित 30 आमदार त्यांना पाठिंबा देतील.
काय म्हणते आमदारांचे गणित?
विशेष म्हणजे भाजपकडे सध्या 71 आमदार असून एक जागा जिंकण्यासाठी 41 आमदारांची मते आवश्यक आहेत, अशा परिस्थितीत दोन उमेदवारांसाठी 82 मतांची आवश्यकता आहे. आता भाजपला पाठिंबा देणाऱ्या दुसऱ्या उमेदवाराला 11 मते कमी पडत आहेत. अशा परिस्थितीत भाजपला हनुमान बेनिवाल यांच्या पक्ष आरएलपीच्या 3 आमदारांचा पाठिंबा मिळाल्यास एकूण संख्या 74 होईल.
दरम्यान असे तर्क लावले जात आहेत की, भाजप आपल्या दुसऱ्या उमेदवारासाठी 11 मते कशी वाढतील याचे पाहत आहे. त्यातच आता बेनिवाल यांच्या पक्ष आरएलपीच्या 3 आमदारांचा पाठिंबा मिळाल्यास हा आकडा कमी होईल. तर तो 8 मतांवर येईल. तर या कमी पडणाऱ्या 8 मतांसाठी भाजपकडून घोडेबजार केला जाईल. दुसरीकडे, काँग्रेसने 126 आमदारांच्या समर्थनाचा दावा केला आहे. त्यात 108 स्वतःचे आणि 13 समर्थित अपक्ष आमदार, एक आरएलडी, दोन सीपीएम आणि दोन बीटीपी आमदारांच्या समावेश आहे.