…आणि ममता दिदीच्या खासदारानं संसदेत बोलता बोलता राजीनामा दिला..भाजपात जाणार?

| Updated on: Feb 12, 2021 | 3:26 PM

तृणमूल काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री दिनेश त्रिवेदी यांनी आज संसदेत बोलता बोलता आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला (Rajya sabha member from TMC Dinesh trivedi announces on floor resigning)

...आणि ममता दिदीच्या खासदारानं संसदेत बोलता बोलता राजीनामा दिला..भाजपात जाणार?
Follow us on

नवी दिल्ली : तृणमूल काँग्रसेच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पुन्हा एकदा मोठा झटका बसला आहे. तृणमूल काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री दिनेश त्रिवेदी यांनी आज संसदेत बोलता बोलता आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. “राज्यसभेचा खासदार असूनही राज्यातील हिंसाचारावर तोडगा काढू शकत नाही. त्यामुळे घुसमट होतेय”, अशी प्रतिक्रिया देत त्रिवेदी यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला (Rajya sabha member from TMC Dinesh trivedi announces on floor resigning).

“माझ्या राज्यात हिंसा सुरु आहे. त्यावर आपण काहीच बोलू शकत नाही. या विषयावर जर काही बोलू शकत नाही तर मग मी त्यापेक्षा माझ्या सदस्यत्वाचा राजीनामा देतोय”, अशी खदखद दिनेश त्रिवेदी यांनी व्यक्त केली.

“मी माझ्या पक्षाचा आभारी आहे. त्यांनी मला राज्यसभेत पाठवलं. पण आता माझी घुसमट होतेय. माझ्या राज्यात हिंसा सुरु आहे आणि मी काहीच करु शकत नाहीय. माझी अंतरात्मा मला सांगतेय, इथे बसून जर काही करु शकत नाही तर आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. त्यामुळे मी राजीनामा देतोय. मात्र, मी राजीनामा दिल्यानंतरही बंगलाच्या लोकांचं काम करत राहील”, अशं त्रिवेदी राज्यसभेत म्हणाले.

दिनेश त्रिवेदी भाजपात जाण्याच्या तयारीत?

भाजप बंगालमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधनीला लागली आहे. ममता सरकारला सुरुंग लावण्यासाठी भाजप सर्वेतोपरी प्रयत्न करत आहे. भाजपने याआधी ममता बॅनर्जी यांचे एकेकाळी निकटवर्तीय मानले जाणारे शुभेंदु अधिकारी, मुकूल रॉय सारख्या बड्या नेत्यांना भाजपात सामील करुन घेतलं आहे. भाजपने आता दिनेश त्रिवेदी यांच्याकडे आपला मोर्चा वळवलाय. त्रिवेदी देखील भाजप प्रवेशासाठी सकारात्मक असल्याची चर्चा बंगालच्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत अशी कोणतीही माहिती भाजप आणि त्रिवेदी यांच्याकडून देण्यात आलेली नाही.

भाजपची खुली ऑफर

दरम्यान, दिवेश त्रिवेदी यांच्या खासदारकीच्या राजीनाम्यानंतर भाजप नेते कैलाश विजयवर्गीय यांनी त्रिवेदी यांना भाजपात येण्याचं खुलं आमंत्रण दिलं आहे. “दिनेश त्रिवेदी वर्षभरापूर्वी मला एका विमानतळावर भेटले होते. तेव्हा परिस्थिती खूप विचित्र आहे. त्यामुळे काम करु शकत नाही, असं त्यांनी सांगितलं होतं. त्यांनी आता टीएमसीला सोडचिठ्ठी दिली आहे. ते भाजपात आले तर आम्ही त्यांचं स्वागतच करु”, असं विजयवर्गीय म्हणाले आहेत (Rajya sabha member from TMC Dinesh trivedi announces on floor resigning).

हेही वाचा : 15 फेब्रवारीपासून महाविद्यालये सुरु, कोरोना प्रतिबंधक नियम पाळणे बंधनकारक : उदय सामंत