CAB Bill : लोकसभेनंतर राज्यसभेतही नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर

लोकसभेनंतर आता राज्यसभेतही नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आलं (Citizenship amendment bill 2019) आहे. विधेयकाच्या बाजूने 117 मतं पडली आहे.

CAB Bill : लोकसभेनंतर राज्यसभेतही नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर
Follow us
| Updated on: Dec 11, 2019 | 9:28 PM

नवी दिल्ली : लोकसभेनंतर आता राज्यसभेतही नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आलं (Citizenship amendment bill 2019) आहे. विधेयकाच्या बाजूने 117 मतं पडली आहेत. तर विधेयकाच्या विरोधात 92 मतं पडली. दरम्यान लोकसभेत शिवसेनेने विधेयकाच्या बाजूने मतदान केले (Citizenship amendment bill 2019) होते. मात्र राज्यसभेत मतदानावेळी शिवसेनेनं सभात्याग करत विरोध (Citizenship amendment bill 2019) दर्शवला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेनंतर राज्यसभेत हे विधेयक मांडलं. या विधेयकावर सकाळपासून चर्चा सुरु होती. त्यानंतर रात्री 8 च्या सुमारास यावर मतदानप्रक्रिया सुरु करण्यात आली.

मतदान घेताना सर्वात आधी नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदीय निवड समितीकडे पाठवण्याबाबत मतदान घेतलं गेलं. यावेळी विधेयक संसदीय निवड समितीकडे पाठवण्याच्या विरोधात 113 मतं पडली, तर प्रस्तावाच्या बाजूने 92 मतं पडली. यावेळी शिवसेनेने सभात्याग केला. त्यानंतर विधेयकांवरील 14 सूचनांवर मतदान घेतलं गेलं. पण यातीलही बहुतेक सूचना फेटाळण्यात आल्या.

यासर्व प्रक्रियेनंतर नागरिकत्व सुधारणा विधेयकावर अंतिम मतदान घेण्यात आलं. या अंतिम मतदानादरम्यान विधेयकाच्या बाजूने 117 मतं पडली. तर विरोधात 92 मतं पडली.

लोकसभेतही विधेयक मंजूर

नागरिकत्व सुधारणा विधेयक सोमवारी रात्री उशिरा (9 डिसेंबर) लोकसभेत मंजूर करण्यात आले. लोकसभेत विधेयकाच्या बाजूने 311 मतं पडली. तर 80 मतं ही विधेयकाच्या विरोधात पडली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी (9 डिसेंबर) वादग्रस्त ठरलेले नागरिकत्व सुधारणा विधेयक (Citizenship amendment bill 2019) लोकसभेत मांडले.

नागरिकत्व विधेयकात नेमके काय आहे?

नागरिकत्व संशोधन विधेयकात  1955 च्या नागरिकत्वाच्या कायद्यात बदल करण्याचा प्रस्ताव आहे. या अंतर्गत पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तातून भारतात आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ईसाई शरणार्थींना नागरिकत्व देण्यात येईल. जे शरणार्थी एक वर्ष ते सहा वर्षे भारतात राहतात अशा व्यक्तींना नागरिकत्व दिले जाईल. दरम्यान सध्या भारताचे नागरिकत्व मिळवण्यासाठी भारतात 11 वर्षे वास्तव्य असणे आवश्यक आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.