अयोध्या : भव्य राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाल्यापासून दर्शनासाठी आतापर्यंत लाखो भाविकांनी दर्शन घेतले आहे. रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी दररोज देशभरातून लाखो रामभक्त अयोध्येत पोहोचत आहेत. केवळ भारतातूनच नव्हे तर परदेशातून देखील लोकं अयोध्येत येत आहेत. इतकंच नाही तर मुस्लीम समाजाच्या लोकांनी ही अयोध्येत रामलल्लाचे दर्शन घेतले आहे. 250 मुस्लीम समाजाच्या लोकांना राम मंदिरात रामलल्लाचे दर्शन घेतले आणि जय श्री रामचा नारा ही दिला.
25 जानेवारी 2024 रोजी, शेकडो मुस्लीम राम भक्तांचा एक गट लखनौ येथून अयोध्येला रवाना झाला होता. अशा परिस्थितीत 30 जानेवारीला सुमारे 250 लोक राम मंदिरात पोहोचले. दर्शनासाठी आलेले हे मुस्लिम समाजातील लोक भगवान रामांना आपला पूर्वज मानतात. लखनौपासून अयोध्येपर्यंत हे मुस्लीम रामभक्त सुमारे 135 किलोमीटर पायी आले आहेत. पायी चालत अयोध्येला पोहोचण्यासाठी त्यांना सुमारे पाच दिवस लागले.
RSS Rashtriya Muslim Manch members taking Darshan in Ayodhya Ram Mandir.
Secular India 🇮🇳#Ayodhya #Gyanvapi #Mathura #BasicHumanRight #ChandigarhMayorElection #Chandigarh pic.twitter.com/69JVt524OB
— Veena Jain (@DrJain21) January 31, 2024
राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते करण्यात आली होती. त्यानंतर 23 जानेवारीपासून राम मंदिर सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले आहे. 23 जानेवारी ते 29 जानेवारीपर्यंत सुमारे 20 लाख लोकांनी रामललाचे दर्शन घेतले आहे. भाविकांची गर्दी दररोज वाढतच आहे. त्यामुळे मंदिराने दर्शनाची वेळ एक तासाने वाढवली आहे. इतकंच नाही तर 22 जानेवारी पासून आतापर्यंत 5 कोटी 60 लाखांहून अधिक लोकांनी देणगी दिली आहे.
५०० वर्षाहून अधिक काळानंतर अयोध्येत भव्य राम मंदिरात बनवण्यात आले आहे. त्यामुळे देशभरात आनंदाचे वातावरण आहे. भगवान श्रीराम हे क्षत्रिय होते. हिंदू आणि मुस्लिमांचे गोत्र एकच आहे. भगवान श्रीराम हे आपले पूर्वज आहेत आणि आपण त्यांचे वंशज आहोत. आमचा धर्म सनातन आहे आणि आम्हाला प्रभू श्री रामाबद्दल खूप प्रेम आहे असं या मुस्लीम लोकांनी म्हटले आहे.